पिंपरी चिंचवड हादरलं! चाकणमध्ये नाईट शिफ्टला निघालेल्या महिलेचा पाठलाग करुन केला अतिप्रसंग

गुन्ह्याची माहिती मिळताच उपायुक्त (झोन 3) शिवाजी पवार, गुन्हे शाखेचे पथक आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीनं तपास सुरू केला.

Mumbai Tak

मुंबई तक

15 May 2025 (अपडेटेड: 15 May 2025, 09:18 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पिंपरी चिंचवडमध्ये नाईट शिफ्टला निघालेल्या तरूणीवर अतिप्रसंग

point

पाठलाग करुन तरूणानं हल्ला केला, नंतर केला अतिप्रसंग

point

पीडित महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू

Pune Crime News : पुणे आणि परिसरात गुन्हेगारीच्या घटनांना ब्रेक लावण्यात पुणे पोलीस अपयशी ठरत आहेत की काय असा प्रश्न पडतोय. कारण आता पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. चाकण एमआयडीसी परिसरातील मेदनकरवाडीमध्ये मंगळवारी नाइट शिफ्टला जाणाऱ्या 27 वर्षीय महिलेवर अज्ञात व्यक्तीने क्रूरपणे हल्ला करून बलात्कार केला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> भारतात खळबळ उडवून देणारी Inside स्टोरी, पाकिस्तान दहशतवादी मसूद अझहरला देणार तब्बल 14 कोटी!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला कामावर जात असताना एका अज्ञात व्यक्तीनं तिचा पाठलाग केला. खंडोबा मंदिराजवळ तिला अडवून, तिला जबरदस्तीने एका निर्जन ठिकाणी नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. पीडितेला तातडीने यशवंतराव चव्हाण मेमोरियल (YCM) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे.

आरडाओरडा केला, पण प्रयत्न निष्फळ ठरले

महिलेलवर जेव्हा हल्ला झाला, तेव्हा तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडाही केला, मात्र तिच्या मदतीला कुणी धावलं नाही. त्याभागात काहीजण चालण्यासाठी आलेले होते, त्यांनाही हा प्रकार लक्षात आला नाही अशी माहिती आहे. अखेर महिलेनं आरोपीला चावाही घेतला, मात्र तिचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि आरोपीने अतिप्रसंग केला. 

पोलिसांनी तातडीनं सुरू केला तपास 

या घटनेनं स्थानिक महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, औद्योगिक क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली आहे. गुन्ह्याची माहिती मिळताच उपायुक्त (झोन 3) शिवाजी पवार, गुन्हे शाखेचे पथक आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीनं तपास सुरू केला. तसंच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी आणि रहिवाशांची चौकशीही सुरू करण्यात आली आहे.

हे ही वाचा >> बकऱ्या चारणाऱ्या वृद्ध व्यक्तीसमोर न्यूड झाली अन्... अश्लील चाळे करणारी तरुणी निघाली सॉफ्टवेअर इंजिनिअर, पुढे तर...​​​​

दरम्यान, चाकण पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या सहाय्याने आरोपींचा शोध घेण्यासाठी सहा विशेष पथकं स्थापन केली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींची ओळख पटवली. आरोपीचं नाव प्रकाश तुकाराम भांगरे (मेदनकरवाडी, मूळ गाव अहिल्यानगर) असं आहे. पोलिसांनी भांगरे याला ताब्यात घेतलं आणि चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

24 तासाच्या आत आरोपी अटक 

या घटनेनंतर अवघ्या 24 तासांत आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पुढील तपास सुरू असून, या प्रकरणी कठोर कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. 

    follow whatsapp