Pune Crime: लग्नानंतर केवळ 15 दिवसात पती नपुंसक असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पण असलं तरी सासूला मुलगा हवा होता, त्यासाठी सुनेला सासऱ्याशी शरीरसंबंध ठेवावे लागतील, अशी मागणी केली. या धक्कादायक घटनेनं पुणे हादरून गेलं आहे. संबंधित प्रकरणात आरोपी पती गौरव जयसिंग तांबे (वय 35), सासू श्रद्धा जयसिंग तांबे (56 वय) आणि सासरे जयसिंग तांबे (वय 61) यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बीड हादरलं! चिमुरडीचा गळफास घेतलेला मृतदेह झाडाला आढळला, त्याच ठिकाणी वडिलांचाही मृतदेह... हादरून टाकणारं प्रकरण
नेमकं काय घडलं?
फिर्यादीत केलेल्या एकूण तक्रारीनुसार, सासरे हे पोलीस खात्यातील निवृत्त सहाय्यक पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी ओळखीचा धाक दाखवून रात्री घरात घुसत फिर्यादीला जबरदस्ती पकडले आणि शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली होती.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी पती गौरवचा आणि पीडित तरुणीचा पाच महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर पंधरा दिवसानंतर नवरा बायको हनिमूनसाठी महाबळेश्वरला गेले होते. तेव्हा पती गौरवने आपल्या पत्नीला शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला होता.
हे ही वाचा : 6 वर्षाच्या मुलीला 5 रुपयांचे आमिष दाखवून दोघांनी निर्जनस्थळावरील खोलीत नेलं, नंतर लैंगिक शोषण करत पीडितेला रक्तस्त्राव...
'मी नपुंसक आहे आमच्या वंशासाठी...'
'मी नपुंसक आहे, आमच्या वंशासाठी तुला माझ्या वडिलांसोबतच शारीरिक संबंध ठेवावं लागेल आणि मुलाला जन्म द्यावा लागेल.', असे त्याने आपल्या पत्नीला सांगितलं. त्यानंतर सासूने आणि पतीने वारंवार त्रास देण्यास सुरुवात केली होती. 10 सप्टेंबर रोजी सासरे जयसिंग तांबे यांनी फिर्यादीच्या घरी घुसून जबरदस्ती शारीरिक सुखाची मागणी केली. या प्रकरणात सहकारनगर पोलिसांनी या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या संपूर्ण घटनेने पीडित महिलेला खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे. ज्या पतीसोबत तिने आयुष्यभराची स्वप्न पाहिलं होती तो आपल्याला शारीरिक सुख न देता स्वत:च्याच वडिलांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती करत असल्याचा धक्का महिला पचवू शकली नाही. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असला तरी या सगळ्या प्रकरणामुळे महिलेच्या मनावर मोठा आघात झाला आहे. तसंच पीडित महिला आणि तिच्या माहेरकडील लोकांना अंधारात ठेवून हे लग्न पार पडलं त्यामुळे आपली मोठी फसवणूक झाल्याचंही पीडितेने यावेळी आरोप केल आहे.
ADVERTISEMENT











