Viral News: पुण्याची वाट लागली... नदीपात्रातील हाणामारीचा 'हा' Video आणेल तुमच्याही अंगावर काटा

पुण्यातील डेक्कन भागातील चौपाटी परिसरात एका हॉटेल मालकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

pune deccan chowpatty area has gone viral on social media showing a hotel owner being brutally assaulted by a group of men with chairs

Viral Video

ओमकार वाबळे

14 Oct 2025 (अपडेटेड: 14 Oct 2025, 10:38 PM)

follow google news

पुणे: पुण्यातील डेक्कन भागातील चौपाटी परिसरात एका हॉटेल मालकाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही व्यक्ती हॉटेल मालकावर खुर्च्या आणि इतर वस्तूंनी सतत हल्ला करताना दिसत आहेत. हल्ल्यात त्या व्यक्तीच्या डोक्याला गंभीर मार लागून तो रक्तबंबाळ झाल्याचे दिसत आहे.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल मालक चालत असताना आरोपींपैकी एका व्यक्तीस धक्का लागल्याने अचानक वाद सुरू झाला. या वादाचं पर्यवसान हे काही क्षणांतच मारहाणीमध्ये झालं. आरोपींनी हॉटेल मालकाला रस्त्यातच अडवून त्याच्यावर खुर्च्या आणि इतर वस्तूंनी हल्ला केला.

हे ही वाचा>> पुणे: तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप, नंतर तरुणीला मारहाण, अखेर बॉयफ्रेंडची हत्या, नंतर मृतदेह चादरीत गुंडाळून...

या घटनेत हॉटेल मालक गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अनेक लोकांनी हा प्रकार पाहिला, मात्र कोणीही हस्तक्षेप केला नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे.

या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आरोपींची नावे अशी आहेत —

गणेश सतीश रणखांब (वय 35, रा. साईनाथ वसाहत, शास्त्रीनगर, कोथरुड),

गणेश राजेंद्र कोंढाळकर (वय 27),

चिन्मय प्रविण पुरुळेकर (वय 35).

हे ही वाचा>> Pune: कोथरूडच्या गुन्हेगारीवर भाजपच्या दिग्गज नेते का धरतायेत मौन?

पोलिसांनी सांगितले की, राज्य सरकारच्या आदेशानुसार हॉटेल उशिरापर्यंत सुरू असल्याने ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. आरोपींवर हल्ला, मारहाण आणि सार्वजनिक शांतता भंग करण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

घटनेनंतर डेक्कन परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून व्यापारी व स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी केली आहे. पोलीस अधिकारी सांगत आहेत की, “कोणीही कायदा हातात घेतल्यास त्याच्यावर कठोर कारवाई होईल.

    follow whatsapp