Pune Metro : तुकाराम मुंढेंचा कॉल.. दुकानाला सील आणि पुण्यात पेढ्यांचा कहर

मुंबई तक

17 Jun 2026 (अपडेटेड: 17 Jun 2026, 01:33 PM)

Pune Metro : पुण्यातील खराडी आणि वडगाव शेरी परिसरात पेढे खाल्ल्यानंतर अनेक जणांना उलट्या, जुलाब आणि गंभीर डिहायड्रेशनचा त्रास झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एफडीएकडून नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून संबंधित डेरीवर कारवाई करण्यात आली आहे.

Pune Metro

Pune Metro

Google CTA

बातम्या हायलाइट

point

Pune Metro : तुकाराम मुंढेंचा कॉल..

point

दुकानाला सील आणि पुण्यात पेढ्यांचा कहर

Pune Metro :  पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करण्यासाठी एका कुटुंबाने मिठाईचे पेढे वाटले आणि त्यानंतर काही तासांतच अनेक जण आजारी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोठ्या भावाने नवीन कार घेणार असल्याने लहान भाऊ आपल्या कुटुंबीयांसह शोरूममध्ये गेला होता. दोन्ही भावांचे आई-वडील, नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होते. आनंदाच्या वातावरणात वडगाव शेरीतील गुरुनानक स्वीट मार्टमधून पेढे घेण्यात आले आणि ते कुटुंबीयांसह शोरूमच्या कर्मचाऱ्यांनाही वाटण्यात आले. मात्र, घरी परतल्यानंतर काही तासांतच उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला आणि अनेकांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

हे वाचलं का?

हेही वाचा : Operation Tiger Live Updates : संजय राऊतांनी 'या' दोन खासदारांसह घेतली ओम बिर्लांची भेट, काय घडणार?

पेढे खाल्ल्यानंतर उलट्या अन् जुलाब 

या प्रकरणातील पीडित आसिफ काजी यांनी सांगितले की, कार डिलिव्हरीनंतर त्यांनी स्वतः, कुटुंबीय आणि शोरूममधील कर्मचाऱ्यांना पेढे दिले. त्यांच्या 11 महिन्यांच्या मुलीला सर्वप्रथम उलट्या आणि जुलाब सुरू झाले. त्यानंतर त्यांनाही तीव्र त्रास जाणवू लागला. रात्रभर दोघांनाही सतत उलट्या होत राहिल्या आणि मुलीला गंभीर डिहायड्रेशन झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. काजी यांनी सांगितले की त्यांच्या कुटुंबातील सात ते आठ जणांना त्याच प्रकारचा त्रास झाला. काहींना औषधांनी आराम मिळाला, तर काहींना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांच्या वडिलांनाही प्रवासादरम्यान तब्येत बिघडल्याने टेंभुर्णी येथे उपचार घ्यावे लागले.

हेही वाचा : 'गदारीचा शिक्का लावून...', ओमराजे निंबाळकरांनी 'तो' व्हिडीओ शेअर करताच कमेंट्सचा पाऊस

खराडी आणि वडगाव शेरी परिसरातील आणखी काही कुटुंबांनीही अशाच प्रकारच्या तक्रारी केल्या आहेत. विविध प्रसंगी गुरुनानक डेरीमधून आणलेले पेढे वाटल्यानंतर लोक आजारी पडल्याचे त्यांनी सांगितले. एका तक्रारदार डॉक्टर महिलेच्या म्हणण्यानुसार जवळपास 40 ते 45 जण बाधित झाले आहेत. या प्रकरणात संबंधित डेरीचे मालक, त्यांचे वकील आणि एफडीएची एक महिला अधिकारी रुग्णालयात एकत्र दिसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या भेटीमुळे संशय निर्माण झाल्याचे तक्रारदार महिलेने सांगितले असून या संदर्भात चंदननगर पोलीस ठाण्यातही चर्चा झाली आहे. नंतर संबंधितांनी आपले स्पष्टीकरण बदलल्याचा दावाही करण्यात आला आहे.

तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर कारवाई 

या घटनेनंतर एफडीएकडून गुरुनानक डेरीचे रिटेल आउटलेट तसेच उत्पादन केंद्र सील करण्यात आले आहे. पेढ्यांचे आणि इतर खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून नेमके कोणत्या कारणामुळे लोकांना त्रास झाला, याचा अहवाल येणे बाकी आहे. भेसळ, दूषित घटक, निकृष्ट खवा, स्वच्छतेचा अभाव किंवा जुनी मिठाई यापैकी कोणते कारण असू शकते, याची तपासणी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, फूड अँड ड्रग प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर या प्रकरणात कारवाईला वेग आल्याचे सांगितले जात आहे. पेढे खाल्लेल्या अनेकांना उलट्या, जुलाब आणि डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने पुण्यातील हा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.