पुण्यात 'या' भागांत पावसाची जोरदार बॅटिंग, कुमशेत परिसरात ढगफुटी सदृश्यस्थिती

Pune Monsoon : पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील माळशेज अणे परिसरात पावसाने दमदार बॅटिंग केली आहे. कुमशेत परिसरात ढगफुटीसदृश्य स्थिती निर्माण झाली. कुमशेतच्या रस्त्याला पाण्याचं स्वरुप प्राप्त झालं आहे. यामुळे नागरिकांची धावपळ उडाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा धोका निर्माण झाला नाही.

Pune monsoon

Pune monsoon

मुंबई तक

22 Jun 2026 (अपडेटेड: 22 Jun 2026, 10:10 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

माळशेज ते अणे परिसरात पावसाचा धुमाकूळ

point

 रस्त्याला पाण्याचे स्वरुप

point

'या' परिसरात ढगफुटी सदृश्यस्थिती

Pune Monsoon : रायचंद शिंदे - पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील माळशेज अणे परिसरात पावसाने दमदार बॅटिंग केली आहे. कुमशेत परिसरात ढगफुटीसदृश्य स्थिती निर्माण झाली. कुमशेतच्या रस्त्याला पाण्याचं स्वरुप प्राप्त झालं आहे. परिसरातील भूभाग आणि मुरबाड भाग असल्याने पाणी आदिवासी वस्तीकडे वाहत गेले आहे. या वस्तीला आणि शाळेला पाण्यात वेढा घातला होता. यामुळे नागरिकांची धावपळ उडाली आहे. अचानकपणे वाढलेल्या या पाण्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा धोका निर्माण झाला नसल्याची सकारात्मक बाब आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : "ओमराजे रिलस्टार नाही, तर...", एकनाथ शिंदेंकडून तोंडभरून कौतुक

माळशेज ते अणे परिसरात पावसाचा धुमाकूळ

माळशेज ते अणे परिसरात पावसाने धुव्वादार हजेरी लावली होती. ज्यात कुमशेत, ओतूर, रोहोकडी आंबेगव्हाण, अहिनेवाडी, डिंगोरे, मढ, पारगाव, नेतवड, ठीकेकरवाडी, हिवरे खुर्द, डुंबरवाडी आणि धोलवड या भागात अधिक पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

रस्त्याला पाण्याचे स्वरुप

या पावसामुळे डोंगराळ भागातील नदी नाले-ओढे वाहू लागल्याचे दिसून आले. काही ठिकाणी पाण्याचे छोटे तलाव देखील तयार झाले आहेत. ओतूर शहरात रस्त्याला पाण्याचे स्वरुप आले आहे. पाणी वाढल्याने वाहन चालकांना पाण्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

हे ही वाचा : द्धव ठाकरेंनी बैठक बोलावली, पण 3 आमदारांची दांडी; कोण-कोण राहिलं गैरहजर?

पेरणीपूर्वीच्या मशागत कामांना मोठी गती मिळणार आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस काही दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागल्याने नागरिक पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहू लागली आहेत.