इंदापूरातील मदनवाडी गावात गर्भवती महिलेचा चादरीत आढळला मृतदेह, हातावर होता 'त्या' नावाचा टॅटू

Pune News : पुणे जिल्ह्याच्या मदनवाडी गावाच्या सीमेवर असलेल्या एका पुलाखालील पाण्यात गर्भवती महिलेचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

pune news

pune news

मुंबई तक

• 02:39 PM • 23 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावाच्या सीमेवर गर्भवती महिलेचा मृतदेह आढळला

point

घटनेनं परिसरात एकच खळबळ

Pune News : पुणे जिल्ह्याृतील इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावाच्या सीमेवरील एका पुलाखालील पाण्यात गर्भवती महिलेचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे. ही घटना दौंड-भिगवण परिसरातील असून या घटनेत पोलिसांनी लक्ष घालत घटनेचा एकूण तपास केला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासातून अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, महिलेचं वय वर्षे अंदाजे 20 ते 25 वर्षे सांगितले जात आहे. तिच्या हातावर टॅटू दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : दिवाळीत बीड हादरलं! फटाके फोडताना झाला स्फोट, 6 वर्षाच्या मुलाच्या डोळ्याला मोठी इजा, नेमकं काय घडलं?

मृतदेह चादरील गुंडाळलेल्या अवस्थेत...

संबंधित मृतदेह हा एका चादरील गुंडाळलेल्या अवस्थेत असून महिलेच्या हातावर रविराज नावाचा टॅटू दिसत आहे. महिलेचा कोणी तरी खून केल्याचा अंदाज पोलीस बांधत आहेत. भिगवण पोलीस संबंधित प्रकरणाचा सखोल तपास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महिला ही सहा महिने गरोदर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी महिलेच्या मृतदेहाची तपासणी करत मृतदेह ताब्यात घेतला. 

मृतदेहाला काही महिने झाले असल्याने मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांना अडचण ठरत आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हा खुनाचा प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.तरुणीचा खून करून पूलाखाली मृतदेह टाकण्यात आल्याचा भिगण पोलिसांनी संशय व्यक्त केल्याची माहिती वृत्तमाध्यमांनी दिली आहे. 

हे ही वाचा : फटाक्यावर ठेवला ग्लास अन् झाला स्फोट, ग्लासाचे तुकडे होऊन घुसल्या तरुणाच्या शरीरात, रुग्णालयातच...

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

याच प्रकरणात भिगवण पोलीस घटनेचा तपास करत आहेत. आसपासच्या परिसरात सीसीटीव्ही फुटेज, हरवलेल्या महिलांच्या तक्रारी, मोबाईल लोकेशनची तपासणी केली जात आहे. संबंधित महिलेची ओळख पटवणे पोलिसांना एकप्रकारे आव्हान असल्याचे बोलले जात आहे. महिलेची ओळख पटल्यानंतर खूनामागचं सत्य समोर येण्यास फार वेळ लागणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

    follow whatsapp