फटाक्यावर ठेवला ग्लास अन् झाला स्फोट, ग्लासाचे तुकडे होऊन घुसल्या तरुणाच्या शरीरात, रुग्णालयातच...
Viral News Diwali : तरुणाने फटाका फोडताना त्यावर एक ग्लास ठेवला, फटाका फुटल्यानंतर ग्लास उडाला आणि त्यातील तुकडे हे मुलाच्या शरीरात शिरल्याची मन हेलावून टाकणारी घटना आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

त्याने फटाक्यावर एक ग्लास ठेवला नंतर...

तरुणाला रुग्णालयात नेले आणि रक्तस्त्रावाने...

ऐन दिवाळी सणाला गालबोट
Viral News Diwali : दिवाळी हा आनंदाचा सण असतो, पण याच आनंदाच्या सणाला अनेकदा गालबोट लागण्याची शक्यता असते. एका कुटुंबात ऐन दिवाळी सणातच नियतीने काळाचा घाला घातला. तरुणाने फटाका फोडताना त्यावर एक ग्लास ठेवला, फटाका फुटल्यानंतर ग्लास उडाला आणि त्यातील तुकडे हे मुलाच्या शरीरात शिरल्याची मन हेलावून टाकणारी घटना आहे. यात तरुणाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना आहे. संबंधित मृत तरुणाचे वय वर्षे हे 20 होते, ही घटना उत्तर प्रदेशातील नोयडा येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : दिवाळीत बीड हादरलं! फटाके फोडताना झाला स्फोट, 6 वर्षाच्या मुलाच्या डोळ्याला मोठी इजा, नेमकं काय घडलं?
त्याने फटाक्यावर एक ग्लास ठेवला नंतर...
संबंधित प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, मृताचे नाव शिवा असे असून तो बिलाल मस्जित गली, छिजारसी कॉलनीतील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, तरुण हा आपल्या कुटुंबियांसोबतच दिवाळी साजरी करत होता. फटाके फोडण्यासाठी त्याने फटाक्यावर एक ग्लास ठेवला. फटका पेटवल्यानंतर फटाका मोठ्याने फुटला असता, ग्लासाचे तुकडे झाले आणि ते तुकडे संबंधित मुलाच्या शरीरातच घुसले. यानंतर तरुणाची प्रकृती बिघडली आणि त्याला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण नंतर उपचारादरम्यान, तरुणाचा मृत्यू झाला.
तरुणाला रुग्णालयात नेले आणि रक्तस्त्रावाने...
या घटनेनंतर, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि त्यानंतर शवविच्छेदनासाठी नेला. शिवाचा अधिक रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची पुढील कायदेशीर चौकशी पोलिस करताना दिसत आहेत.
हे ही वाचा : सचिन, द्रविडला जमलं नाही, ते रोहित शर्माने करुन दाखवलं, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला
आनंदाचा सण म्हणून आपण दिवाळी सणाकडे पाहतो, पण आनंदाच्या सणाचे क्षणार्धात शोकात रुपांतर होते, ही महत्त्वाची बाब लक्षात घेण्यासारखी आहे. फटाक्यांच्या अनेक घटना देशभरातही घडताना दिसत आहे. राज्यातील बीड जिल्ह्यातही एका लहान मुलाचा फटाक्याच्या स्फोटामुळे डोळा निकामी झाल्याचे सांगण्यात येत आहे.