पुण्यात ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची इमारत कोसळली, 17 जण अडकले

मुंबई तक

08 Jul 2026 (अपडेटेड: 08 Jul 2026, 11:18 PM)

Pune news : पुण्यातील मोशी येथून एक मन सून्न करून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. कचऱ्यापासून उर्जा निर्मिती प्रकल्पाच्या इमारतीचा भाग कोसळ्याची दुर्दैवी घटना आहे. ढिगाऱ्याखाली सतरा जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सततच्या मुसळधार पावसाने जिकडे तिकडे अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत. अशातच पिंपरी चिंचवड परिसरात असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Pune news

Pune news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

उर्जा निर्मितीच्या प्रकल्पाची इमारत कोसळली

point

सतरा जण अडकल्याची माहिती समोर आली

Pune Building Collapes : कृष्णा पांचाळ - पुण्यातील मोशी येथून एक मन सून्न करून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. कचऱ्यापासून उर्जा निर्मिती प्रकल्पाच्या इमारतीचा भाग कोसळ्याची दुर्दैवी घटना आहे. ढिगाऱ्याखाली सतरा जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सततच्या मुसळधार पावसाने जिकडे तिकडे अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत. अशातच पिंपरी चिंचवड परिसरात असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : एक डॉक्टर म्हणून मी…’, महिला डॉक्टरला मारणाऱ्या शिंदेंच्या नगरसेवकावर श्रीकांत शिंदेंची वक्रदृष्टी

उर्जा निर्मितीच्या प्रकल्पाची इमारत कोसळली

प्राथमिक माहितीनुसार, कचरा डेपो जवळ वेस्ट टू एनर्जी प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात कचरा पडल्याने इमारतीचा काही भाग ढासळला. या अपघाताच्या घटनास्थळी एकच खळबळ उडाली आहे. अशातच या भीषण दुर्घटनेत सतरा जण अडकल्याची माहिती समोर आली. या घटनेची एकूण माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमी असलेल्या व्यक्तीला रुग्णालयातच दाखल करण्यात आली होती. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. बचावकार्य सुरु करण्यात आलं असून सतरापैकी सात जणांना काढण्यात यश आलं. 

युद्धपातळीवर बचावकार्य सुरू 

पोलीस अग्निशमन दल आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु असल्याची माहिती आहे. अडकलेल्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

अडकलेल्यांची नावे समोर आली आहेत, 

1. विजय सपकाळ

2. महेश कुंभार

3. दादासाहेब आरडे

4. रणवीर सिंग

5. सोमनाथ शेळके

6. महेश राऊत

7. सनी माने

8. राहुल गायकवाड

9. सुनील कोरके

10. अक्षय सावंत

11. रामप्रताप चव्हाण

12. शुभम पाटील

13. सचिन दाबडगव

14. भावेश वाणी

15. सुजाता शिंदे

16. रणजीत पाटील

17. नागेश गायकवाड

हे ही वाचा : Astrology : जुलै महिन्यात पंचक योग, ‘या’ राशींवर टांगती तलवार

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच नागरिकांची दाणादाण देखील उडाली आहे. या पावसाने मुंबई, पुण्यासह राज्यात अपघाताच्या घटना घडल्याचे वृत्त आहे. अशातच मोशी परिसरात इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी निर्माण झाली नाही.