पुणे: पुण्यातील एका 61 वर्षीय वृद्धाने बुधवारी थेट न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून जीवन संपवल्याची धक्कदायक घटना घडली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली. असे म्हटले जाते की, त्या व्यक्तीने नैराश्य आणि घरगुती समस्यांना त्रासून हे टोकाचं पाऊल उचललं.
ADVERTISEMENT
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, वृद्ध व्यक्तीने इमारतीवरून उडी मारून आपलं जीवन संपवलं. या व्यक्तीच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आणि प्राथमिक तपासात असे दिसून आले की, घरगुती समस्यांमुळे निराश होऊन त्या व्यक्तीने हे पाऊल उचलले. ही घटना शिवाजीनगरमधील नवीन जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत सकाळी 11.45 वाजता घडली.
पोलीसांचा अधिक तपास सुरू
शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, पुण्यातील वडकी परिसरातील रहिवासी यशवंत जाधव यांनी न्यायालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. अधिकाऱ्याने सांगितले की, "त्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. घटनेचा पुढील तपास सुरू आहे."
हे ही वाचा>> सासूचं आणि जावयाचं होतं लफडं, संबंध ठेवल्याचे व्हिडिओही बनवले, नंतर पत्नीसह तिच्या आईने नको तेच...
स्थानिकांनी सांगितले की, तो व्यक्ती तिसऱ्या मजल्यावर गेला आणि त्याने अचानक उडी मारली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जवळच्या लोकांमध्ये एकच घबराट पसरली. त्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ पोलिसांना कळवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला.
हे ही वाचा>> मामीला लागलेली अनैतिक संबंधाची चटक, थेट अल्पवयीन भाच्यासोबत गेली पळून!
टीप: (जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचा कोणी आत्महत्येचा विचार करत असाल, तर ही एक अतिशय गंभीर वैद्यकीय आणीबाणी आहे. तात्काळ भारत सरकारच्या जीवनसाथी हेल्पलाइनशी १८००२३३३३३० वर संपर्क साधा. तुम्ही १८००९१४४१६ वर टेलिमानस हेल्पलाइनवर देखील कॉल करू शकता. तुमची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल आणि या परिस्थितीवर मात करण्यासाठी तज्ज्ञ तुम्हाला आवश्यक सल्ला देतील. लक्षात ठेवा, जीवन हेच सर्वस्व आहे.)
ADVERTISEMENT
