पुण्याची गोष्ट : पुण्यात 'या' भागात उगवला गांजा, बँकॉकहून केली होती तस्करी, नेमका काय आहे प्रकार?

Pune news : पुणे विमानतळावर गांजाची तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे. संबंधित गांजा हा बँकॉकवरून एका प्रवाशाकडून तस्करी करण्यात आला होता. या प्रकरणात धक्कादायक बाब अशी की, हायड्रोपोनिक गांजा असल्याचं बोललं जातंय, नेमकं या रोपाचं काय वैशिष्ट आहे ते समजून घ्या.

Pune news

Pune news

मुंबई तक

• 06:23 PM • 04 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात एअर मार्गाद्वारे भारतात अमली पदार्थींची तस्करी

point

नेमका हायड्रोपोनिक गांजा काय? 

Pune News : पुणे विमानतळावर गांजाची तस्करी केल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला. एका प्रवाशाने बँकॉकवरून या; गांज्याची तस्करी केली. संबंधित प्रकरणातील धक्कादायक बाब अशी, हा गांजा हायड्रोपोनिक प्रकाराचा होता. या गांजाचं वैशिष्ट म्हणजे हा हे पिक मातीशिवाय उगवते, अशी माहिती समोर आली. पुणे विमानतळावरील एअर इंटेलिजेन्स युनिटने याबाबत कठोर कारवाई केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास 34 लाख रुपयांचा गांजा जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 35 वर्षीय महिला सरकारी कर्मचाऱ्याचे लैंगिक शोषण, HIV पॉझिटीव्ह सांगूनही नराधम ऐकेना... पीडितेच्या गुप्तांगावर हल्ला

एअर मार्गाद्वारे भारतात अमली पदार्थींची तस्करी

दरम्यान, परदेशातून भारतात एअर मार्गाद्वारे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थींची तस्करी सुरु असल्याची माहिती आहे. अशातच पुणे विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिटने कारवाई करत तब्बल 34 लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला होता. संबंधित प्रकरणात गांजा तस्करी करणाऱ्या आरोपीच्या गुप्तचर विभागाने मुसक्या आवळल्या. बँकॉकवरून आलेला गांजा पुणे विमानतळावरील प्रवाशांनी जप्त केल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा : नवरा अडाणी, बायको पदवीधर.., इन्स्टाग्राममुळे मोहम्मदच्या नादी लागली; पतीला थंड डोक्याने संपवलं; पुढे काय घडलं?

नेमका हायड्रोपोनिक गांजा काय? 

हायड्रोपोनिक गांजा ही एकूण गांजांपैकी खास व्हरायटी मानली जाते. गांजाचं रोप मातीत उगवतं, पण हायड्रोपोनिक गांज्याचं रोप विशेष प्रकारच्या सॉल्यूशनमध्ये उगवलं जातं. हायड्रोपोनिक पद्धतीने गांजाची लागवड केल्याने त्याला 'हायड्रोपोनिक गांजा', असं म्हटलं जातं, असं त्यामागील कारण आहे. तसेच त्या गांज्यात विशेष प्रकारचे पोषक घटक असतात, ही रोपं विशेष वातावरणातच ठेवली जातात, ज्यामुळे त्याची वाढ होण्यास सोयीचं ठरतं. अशा गांज्याच्या रोपांना पेस्ट कंट्रोलची आवश्यकता भासत नाही.