'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री भारताचा होता प्रचंड मोठा प्लॅन, कराचीत घडणार होतं भयंकर.. वाचा ही Inside स्टोरी

Indian Navy Operation Sindoor Plan :  भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झालं असलं, तरी दक्षिण आशियात भारताकडून सैन्य शक्ती प्रदर्शन सुरु आहे.

Operation Sindoor, Indian Navy

Operation Sindoor, Indian Navy

मुंबई तक

14 May 2025 (अपडेटेड: 14 May 2025, 04:17 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय नौदलची अभूतपूर्व कामगिरी

point

INS विक्रांत आणि कॅरिअर बॅटल ग्रूपचं महत्त्व काय?

point

कराचीत त्या रात्री काय घडणार होतं?

Indian Navy Operation Sindoor Plan :  भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झालं असलं, तरी दक्षिण आशियात भारताकडून सैन्य शक्ती प्रदर्शन सुरु आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांना उद्ध्वस्त केलं. इतकच नव्हे तर भारतीय नौदलानेही ऐतिहासिक कामगिरी केली. या ऑपरेशनमध्ये भारतीय नौदलाने कराचीच्या अरबी समुद्रात 36 युद्धनौका तैनात केल्या होत्या. यामध्ये स्वदेशी विमानवाहू नौका INS विक्रांत, 7 विध्वंसक, 7 फिग्रेड पाणबुड्या आणि वेगवान हल्ला करणाऱ्या जहाजांचा समावेश होता. भारताच्या नौदलाने समुद्री ताकत दाखवल्याने पाकिस्तानचे धाबे दणाणले होते.

हे वाचलं का?

ऑपरेशन सिंदूर

मे 2025 मध्ये जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं. भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा खात्मा करून त्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंतर भारताच्या तिन्ही दलाच्या सैनिकांनी पाकिस्तानवर हल्ला केला.
दहशतवादी अड्ड्यांना नष्ट करणं, हे ऑपरेशन सिंदूरचं ध्येय होतं. भारत कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देऊ शकतो, असा मेसेज पाकिस्तानला द्यायचा होता. 

हे ही वाचा >> ऑनलाईन चाकू मागवला, स्वत:ला संपवलं! चिठ्ठीमध्ये शिक्षणमंत्र्यांकडे काय मागणी केली?

भारतीय नौदलची अभूतपूर्व कामगिरी

1971 नंतर भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय नौदलाने ऑपरेशन ट्रायडेंट आणि ऑपरेशन पायथन दरम्यान कराची बंदरावर हल्ला करण्यासाठी 6 युद्धनौकांचा उपयोग केला होता. या हल्ल्यात पाकिस्तानचं कराची पोर्ट उद्ध्वस्त झालं होतं. परंतु, ऑपरेशन सिंदूरमध्ये 36 युद्धनौकांचा वापर करण्यात आला होता.

INS विक्रांत आणि कॅरिअर बॅटल ग्रूप

आयएनएस विक्रांत भारताचा पहिली स्वदेशी विमानवाहू नौका आहे. 40,000 टन इतकं वजन असणारी ही युद्धनौका मिग-29K लढाऊ विमान, कामोव हेलीकॉप्टर नेण्याची क्षमता आहे.

हे ही वाचा >> पाकिस्तानमध्ये भूकंप भारताच्या हल्लामुळे होतोय?, ही आहे किराणा हिल्सची सगळी Inside स्टोरी!

सात विध्वंसक : बहुआयामी ताकत

भारतीय नौदलाने सात विध्वंसक तैनात केले होते. ब्रम्होस सुपरसोनिक क्रूज मिसाईल, हवेतून हल्ला करणारी मिसाईल्स (MRSAM) यांचा समावेश होता. हे विध्वंसक समुद्रात, हवेतून विरोधकांच्या पाणबुड्यांवर हल्ला करण्यात सक्षम असतात. कोलकाता श्रेणीचे विध्वंसक INS कोलकाता आणि INS चेन्नई, या ताफ्यात सामील होते. 

7 स्टील्थ फ्रिगेट : चपळ आणि शक्ती

सात स्टील्थ गायडेड-मिसाईल फ्रिगेट, ज्यामध्ये INS तुशीललाही तैनाक करण्यात आलं होतं. हे फ्रिगेड वेगवान, मिसाईल प्रणाली आणि स्टील्थ तंत्रज्ञानाने बनवण्यात आलंय. जे हवाई आणि समुद्री हल्ल्यांना प्रभाविपणे सामना करू शकतात. 

    follow whatsapp