Married Woman Shocking Viral News : आजमगढमध्ये एका धक्कादायक घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. येथील अनुराधा नावाच्या महिलेच्या लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाली होती. पण ती गर्भवती झाली नाही. मागील दहा वर्षांपासून अनुराधा गर्भवती राहण्याचा प्रयत्न करत होती. पण अनुराधा आणि तिच्या पतीला या गोष्टीचं टेन्शनच होतं. याचदरम्यान, अनुराधाच्या आयुष्यात चंदूची एन्ट्री झाली. त्यानंतर महिलेसोबत जे घडलं, ते जाणून अनेकांना धक्काच बसला आहे.
ADVERTISEMENT
अनुराधासोबत नेमकं काय घडलं?
वर्ष 2014 मध्ये आजमगढच्या पहलवानपूर गावात राहणाऱ्या अनुराधाचं लग्न या जिल्ह्यातील नौपूरा गावात जमलं. लग्नाच्या दहा वर्षानंतर या दाम्पत्याला अपत्य झालं नाही. तेव्हा अनुराधाला माहित झालं की, तिच्या माहेरी पहलवानपूर गावात चंदू नावाचा तांत्रिक राहतो. रिपोर्टनुसार, अनुराधा आणि तिची आई गावातील हरिजन वस्तीत राहणाऱ्या चंदूजवळ गेली. चंदू दावा करत होता की, दाम्पत्याला अपत्य होईल. यासाठी त्याने एक लाख रुपयांची मागणी केली होती. अनुराधानेही त्याला काही पैसे दिले होते. त्यानंतर चंदूने अनुराधा आणि तिच्या आईला संध्याकाळच्या वेळी त्याच्या घरी बोलावलं.
हे ही वाचा >>व्यापाऱ्यांना मोर्चासाठी परवानगी, मग मराठी माणसाला परवानगी का नाही? मीरा रोडवर मराठी माणूस पेटून उठला
नंतर घडला धक्कादायक प्रकार
चंदूच्या घरी त्याचे 2-3 सहकारीही होते. कुटुंबियांचं म्हणणं आहे की, तिथे जाताच चंदू आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अनुराधाचा गळा आणि तोंड दाबनं सुरु केलं. त्याच्या आईने या गोष्टीचा विरोध केला. तेव्हा चंदू म्हणाला की महिलेवर भूताचं सावट आहे. ते अशाचप्रकारे हटवलं जाईल. त्यानंतर अनुराधाला टॉयलेटचं पाणी पाजलं. त्यानंतर तिची तब्येत बिघडली.
हे ही वाचा >> आईची क्रूरता! 4 वर्षांच्या मुलीला स्टीलच्या रॉडने वार करत... कारण ऐकून थक्क व्हाल
अनुराधाचा मृत्यू झाला, त्यानंतर घडलं..
चंदूने त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने अनुराधाला रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. हे पाहून सर्व आरोपी तिथून फरार झाले. पण चंदू काही वेळातच पोलीस ठाण्यात आला. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी मांत्रिक चंदूविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की, चंदूच्या घरी अशाप्रकारच्या घटना पूर्वीही घडल्या आहेत.
ADVERTISEMENT
