‘महाराष्ट्र भूषण’ आप्पासाहेब धर्माधिकारी : अमित शाहंची उपस्थिती, २० लाख श्रीसदस्य साक्षीदार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

Appasaheb Dharmadhikari has been announced as 'Maharashtra Bhushan' award by the Government of Maharashtra.

Appasaheb Dharmadhikari has been announced as 'Maharashtra Bhushan' award by the Government of Maharashtra.

मुंबई तक

14 Apr 2023 (अपडेटेड: 14 Apr 2023, 05:00 PM)

follow google news

नवी मुंबई : ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. येत्या रविवारी (16 एप्रिल) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून किमान 20 लाख श्रीसदस्य उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. (Appasaheb Dharmadhikari has been announced as ‘Maharashtra Bhushan’ award by the Government of Maharashtra)

हे वाचलं का?

मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी,सिडको अधिकारी,पनवेल , नवी मुंबई मनपा अधिकारी ,रायगड आणि नवी मुंबई पोलीस अधिकारी असे शेकडो अधिकारी या सोहळ्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे. श्री सदस्य देखील श्रमदान करून सोहळ्याची तयारी करत आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत हे वैयक्तिकरित्या सोहळ्यातील नियोजनाचा आढावा घेत आहेत. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खारघर सोहळ्याच्या जागेवर येवून अधिकाऱ्यांना नियोजनाबाबत निर्देश दिले आहेत. खारघर परिसर चकाचक करण्यात आला आहे. सर्व मोकळ्या भूखंडांची सफाई रस्त्यांची डागडुजी नवीन रस्त्यांची निर्मिती अवघ्या 5 दिवसात करण्यात आली आहे.

मोठी बातमी : आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर!

खारघर परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक व्यवस्था बदलण्यात आली आहे. रविवारी सोहळ्याच्या दिवशी अंतर्गत रस्त्यांवरील संपूर्ण वाहतूक बंद ठेवून पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी शनिवारीच खारघर परिसरात दाखल होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबई आणि पनवेल मधील सर्व शाळा शनिवारी ठेवण्याचे निर्देश पनवेलचे आयुक्त गणेश देशमुख आणि नवी मुंबई शिक्षण उपायुक्त योगेश कडूस्कर यांनी दिले आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहन असतील म्हणून ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शासकीय सोहळ्यासाठी संभाव्य गर्दी लक्षात घेवून प्रथमच शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

Maharashtra Bhushan मिळालेले डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी कोण?

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील अवजड वाहतूक दोन दिवस बंद :

या पुरस्कार सोहळ्यासाठी 20 लाख श्रीसदस्य उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. ही शक्यता गृहीत धरून शनिवार (15 एप्रिल) रात्री 12 ते रविवार (15 एप्रिल) रात्री 12 पर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वाहतूक करणाऱ्या वाहनांना मात्र वगळण्यात आलेलं आहे. राज्यपालांच्या आदेशाने असं परिपत्रक काढण्यात आलं असून महामार्ग वाहतूक पोलिसांना याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

    follow whatsapp