बारामती: 16 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीच्या छतावरून उडी, उपचारादरम्यान दुर्दैवी अंत

मुंबई तक

04 Sep 2026 (अपडेटेड: 04 Sep 2026, 02:59 PM)

Baramati News : बारामतीत एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अशा स्थितीत मुलगी गंभीरपणे जखमी झाली असून तिला बारामतीच्या मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आले आहे. उपचारादरम्यान मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे.

Baramati News

Baramati News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सोळा वर्षांच्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन

point

पचारादरम्यान मुलीचा दुर्दैवी मृत्यू

Baramati News : वसंत जाधव - बारामतीत एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अशा स्थितीत मुलगी गंभीरपणे जखमी झाली असून तिला बारामतीच्या मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आले आहे. उपचारादरम्यान मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे. परीक्षांच्या तणावामुळे पीडितेनं जीवन संपवलं. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : किल्ल्यावर केक कापला, नंतर 3 चिमुकल्यांना खाली फेकलं अन् स्वत: मारली उडी, Gold मेडल Winner अश्विनीने का केलं असं?

अभ्यास आणि परीक्षाच्या तणावाखाली विद्यार्थिनीने संपवलं जीवन 

आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीची प्रज्ञा सुनील शिंदे अशी ओळख समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. तिची परीक्षा सुरू असल्याने तिच्यावर अभ्यासाचा तणाव होता. विद्यार्थिनीच्या आई-वडिलांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली की, मागील काही दिवसांपासून विद्यार्थिनी अभ्यास आणि परीक्षाच्या तणावाखाली  होती. 

वडिलांनी आवाज दिला अन् मुलीने चौथ्या मजल्यावरून उडी मारत संपवलं जीवन

विद्यार्थिनी रात्री 12.30 वाजेपर्यंत अभ्यास करायची. नंतर तिने छतावर जात असल्याचे सांगत इमारतीच्या चौथ्या मजल्यावर गेली. बराच वेळ झाला तरीही ती खाली परतली नसल्याचे पाहून आई वडील छतावर गेले. त्याचदरम्यान ती छताच्या कोपऱ्यावर पाय सोडून बसली होती. जेव्हा तिच्या वडिलांनी तिला आवाज दिला असता, तिने कोणताही विचार न करता चौथ्या मजल्यावरून उडी मारत जीवन संपवलं. 

आत्महत्येमागील ठोस कारण..

तिला आई वडिलांसह परिसरातील नागरिकांनी तात्काळपणे रुग्णालयात नेत दाखल केले होते. आई वडिलांनी सांगितलं की, ती काही वेळांपुरतीच शुद्धीत होती, तिने आपल्या आईकडे पाण्याची देखील मागणी केली होती. यानंतर तिची परिस्थिती गंभीर झाली होती. मात्र उपचार सुरू असतानाच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. विद्यार्थिनीच्या आई वडिलांनी या घडलेल्या घटनेबाबत कोणतीही तक्रार केली नाही. मात्र, या आत्महत्येमागील ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. 

हे ही वाचा : Astrology : जन्माष्टमी दिवशी हर्षण योग, 'या' राशींसाठी विशेष दिवस

सुरूवातीला केलेल्या तपासातून समोर आले की, विद्यार्थिनीजवळ स्वत:चा फोन नव्हता. विद्यार्थिनी गरजेनुसार आई वडिलांचा फोन वापरायची. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू ठेवण्यात आला आहे.