Government Jobs : सीमा रस्ते संघटना (BRO) - जनरल रिझर्व्ह इंजिनिअर फोर्स (GREF) अंतर्गत विविध पदांच्या आणि ट्रेड्सच्या एकूण 899 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये माजी सैनिक (ESM) आणि दिव्यांग (PwBD) उमेदवारांसाठी राखीव जागांचाही समावेश आहे. या भरती प्रक्रियेद्वारे ड्राफ्ट्समन आणि इतर विविध पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात, विशेषतः उत्तर आणि पूर्व सीमावर्ती भागात नियुक्ती दिली जाऊ शकते.
ADVERTISEMENT
पात्रतेचे निकष
या भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे (1 जून 2026 रोजी) दरम्यान असणे आवश्यक आहे. शासकीय नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी 10 वर्षांपर्यंत वयोमर्यादा शिथिल करण्यात आली आहे. शैक्षणिक आणि तांत्रिक पात्रतेबाबत बोलायचे झाल्यास, उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून संबंधित क्षेत्रातील आवश्यक पदवी, पदविका किंवा प्रमाणपत्र उत्तीर्ण केलेले असावे.
हे ही वाचा : वाशीम : नगरपालिका देखल घेईना, बापाला मुलांसाठी ड्रेनेजमध्ये उतरण्याची वेळ
वेतन किती?
निवड झालेल्या उमेदवारांना उत्कृष्ट वेतनश्रेणी दिली जाईल. ड्राफ्ट्समन पदासाठी 5,200 ते 20,200 रुपये आणि 2,800 रुपये ग्रेड पे मिळणार आहे. तर इतर सर्व पदांसाठी 1,900 रुपये ग्रेड पे लागू असेल. याशिवाय केंद्र सरकारच्या नियमांनुसार महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), वाहतूक भत्ता आणि हार्ड व रिस्क अलाउन्स देखील देय असेल. अर्ज शुल्काचा विचार केला तर जनरल, आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS), ओबीसी, माजी सैनिक आणि माजी अग्निवीरांसाठी 50 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे, तर अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज पूर्णपणे विनामूल्य आहे.
हे ही वाचा : 'तिनं 11 वर्ष सगळं सहन केलं..' सांगलीतील विवाहितेचा तमिळनाडूत मृत्यू
'इथे' पाठवा अर्ज
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना केवळ 'ऑफलाईन' पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. उमेदवारांनी आपला अर्ज 'कमांडंट, जीआरईएफ केंद्र, दिघी कॅम्प, पुणे' या पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठवायचा आहे. अर्ज प्रक्रिया 21 मे पासून सुरू झाली आहे. राज्यांमधील उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 4 जुलै आहे, तर ईशान्येकडील राज्ये आणि दुर्गम भागातील उमेदवारांसाठी अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 19 जुलै निश्चित करण्यात आली आहे, तर इतर राज्यांतील उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 4 जुलै निश्चित करण्यात आली आहे. या भरतीच्या अधिक माहितीविषयी www.bro.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
ADVERTISEMENT











