Groom And Bride Viral News : उत्तर प्रदेशच्या बरेली येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका नवरीने फेरे घेण्याआधीच नवरा आणि कुटुंबियांना मोठा धक्का दिला. नवरीने संधी साधून प्रियकरासोबत पळ काढला अन् एकच खळबळ उडाली. पाहूण्यांसह कुटुंबियांनी नवरीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण नंतर नवरीच्या घरच्यांनी तिच्या छोट्या बहिणीचं लग्न नवऱ्यासोबत लावलं. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी पळून गेलेल्या नवरीला ताब्यात घेतलं आहे. पण तिने प्रियकरासोबतच राहण्याचा हट्ट धरला आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण दातागंज पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या एका गावातील आहे. येथील एका तरुणीचं 7 जून रोजी लग्न पार पडणार होतं. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. नवरा आणि त्यांचे पाहुणेही लग्नमंडपात पोहोचले होते. दोन्ही कुटुंबीय लग्नाच्या तयारीत व्यस्त होते.
हे ही वाचा >> राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड कोण? सोनमने घरच्या नोकराला पटवलं अन्...खळबळजनक माहिती समोर!
पोलिसांनी पळून गेलेल्या नवरीला घेतलं ताब्यात
याच दरम्यान नवरी प्रियकरासोबत पळून गेली. जेव्हा कुटुंबियांना नवरीच्या या कारनाम्याबद्दल माहित झालं, तेव्हा सर्वांनीच नवरीचा शोध घेण्यास सुरुवात केली. नवरी गावातीलच तरुणासोबत पळून गेल्याचं बोललं जातंय. दरम्यान, याप्रकरणाची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तरुणीला ताब्यात घेतलं.
कुटुंबियांनी घेतला मोठा निर्णय
नवऱ्यासह कुटुंबियांसमोर अपमान होऊ नये, यासाठी नवरीच्या घरच्यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी नवरीच्या लहीन बहिणीचं नवऱ्यासोबत लग्न जुळवलं. रविवारी छोट्या बहिणीचं लग्न लागल्यानंतर कुटुंबियांना दिलासा मिळाला. कारण मोठी मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्यानं कुटुंबियांना बदनामी होण्याची भीती होती. दरम्यान, याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी पळून गेलेल्या नवरीला ताब्यात घेतलं.
हे ही वाचा >> दोन लोकल जवळून क्रॉस झाल्या आणि... CSMT-कर्जत लोकलमध्ये काय घडलं, रेल्वेने सविस्तर सांगितलं
ADVERTISEMENT
