Chhagan Bhujbal : ‘ब्राह्मणांमध्ये शिवाजी-संभाजी नावे ठेवत नाही’, भुजबळांचं विधान

भागवत हिरेकर

20 Aug 2023 (अपडेटेड: 20 Aug 2023, 04:09 AM)

छगन भुजबळ वादग्रस्त विधान : संभाजी भिडे यांच्यावर टीका करताना कॅबिनेट मंत्री भुजबळ यांनी ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे.

what is chhagan bhujbal controversial statement?

what is chhagan bhujbal controversial statement?

follow google news

Chhagan Bhujbal controversial statement : वादग्रस्त विधान करून चर्चेत राहणाऱ्या संभाजी भिडेंबद्दल बोलताना कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी वादग्रस्त विधान केलंय. त्यांच्या या विधानावरून नव्या वादाला तोंड फुटलं असून, ब्राह्मण महासंघाकडून भुजबळांवर टीका करण्यात आलीये. आनंद दवे यांनी भुजबळांना उलट सवाल केलाय. (Chhagan Bhujbal Controversial Statement on Brahmin Community)

हे वाचलं का?

नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना छगन भुजबळ यांनी हे विधान केलंय. शनिवारी (19 ऑगस्ट) समाज दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, “मी ब्राह्मणांवर टीका करत नाहीये. ब्राह्मण वर्ग सोडल्यास तुम्ही आम्ही शुद्र आहोत. त्यानंतर मग अतिशुद्र येतात. शिक्षणाचा अधिकार ब्राह्मण वर्गातील फक्त पुरुषांना होता, महिलांनाही नाही. केवळ दीड टक्का लोकांपुरतेच शिक्षण मर्यादित होते.”

छगन भुजबळांची संभाजी भिडेंवर टीका

अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी संभाजी भिडेंना लक्ष्य केले. ते म्हणाले, “संभाजी भिडे यांचे खरे नाव मनोहर कुलकर्णी आहे. ब्राह्मण समाजात कोणीही शिवाजी-संभाजी नावं ठेवत नाही. त्यामुळे इतिहास मोडणाऱ्यांविरोधात आपल्याला उभे राहावे लागेल”, असं वादग्रस्त विधान भुजबळांनी केले.

वाचा >> Sambhaji bhide:’देशाची स्वातंत्र्यलक्ष्मी कुत्र्याचे…’, संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त विधान

भाषणात भुजबळ पुढे म्हणाले, “मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत. ज्यांचे आपण फोटो लावतो, त्यांनी किती शाळा केल्या. त्यांनी सर्वांना का शिकवले नाही. आपले देव ओळखायला शिका.”

वाचा >> Video: पायाने तुडवीन, लोळेस्तोवर मारेन, संतोष बांगरांनी नेमकी कुणाला दिली धमकी?

ब्राह्मण महासंघाची भुजबळांवर टीका

पुण्यातील ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केलीये. ‘छगन भुजबळ, तुमच्या घरामध्ये किती शिवाजी आणि संभाजी नावे आहेत? तुमच्या मुलांची नावे शिवाजी-संभाजी का ठेवली नाहीत? ओबीसीचं राजकारण करताना तुम्ही मराठा समाजाला आणि छत्रपतींच्या समाजाला नावे ठेवण्याचे काम का करता? हे वक्तव्य मुर्खपणाचे आहे”, अशी टीका दवे यांनी केलीये.

    follow whatsapp