कीपॅड खराब; परीक्षा केंद्रावर Abhijeet Dipke जाताच काय घडलं?

मुंबई तक

17 Aug 2026 (अपडेटेड: 17 Aug 2026, 09:19 AM)

chhatrapati sambhajinagar high court clerk typing skill test : छत्रपती संभाजीनगरमधील परीक्षा केंद्रावर हायकोर्ट लिपिक टायपिंग स्किल टेस्टदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे मोठा गोंधळ झाला. कॉम्प्युटर, कीबोर्ड आणि सॉफ्टवेअरच्या समस्यांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नसल्याची तक्रार आहे.

abhijeet dipke

abhijeet dipke

Google CTA

बातम्या हायलाइट

point

कीपॅड खराब; परीक्षा केंद्रावर Abhijeet Dipke जाताच काय घडलं?

छत्रपती संभाजीनगरमधील एका परीक्षा केंद्रावर आज हायकोर्ट लिपिक टायपिंग स्किल टेस्टदरम्यान मोठा गोंधळ उडाला. तांत्रिक बिघाडामुळे सकाळपासूनच परीक्षा रखडल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. सकाळी 10 वाजता सुरू होणाऱ्या पहिल्या शिफ्टसाठी विद्यार्थी परीक्षा केंद्रात दाखल झाले होते. मात्र, तास उलटूनही परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. दुपारी 1 वाजताच्या दुसऱ्या शिफ्टसाठी आलेले शेकडो विद्यार्थी परीक्षा केंद्राबाहेर ताटकळत उभे राहिले. एकाच दिवशी तीन शिफ्टमध्ये परीक्षा होणार असताना दुपारपर्यंत पहिली शिफ्टही पूर्ण होऊ शकली नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.

हे वाचलं का?

छत्रपती संभाजीनगरमध्ये हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये गोंधळ

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, परीक्षा सुरू झाल्यानंतर कॉम्प्युटर आणि कीबोर्डशी संबंधित अनेक समस्या निर्माण झाल्या. काही कॉम्प्युटरचे कीपॅड व्यवस्थित काम करत नव्हते, तर स्क्रीनवरील कर्सरही स्पष्टपणे दिसत नव्हता. सॉफ्टवेअरमध्येही अडचणी येत असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. काही विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, लॉगिननंतर फोटो दिसत नव्हता, कॅमेरेही सुरू नसल्याची तक्रार होती. एका विद्यार्थिनीने सांगितलं की, तिचा पॅसेज पूर्ण झाल्यानंतरही स्क्रीनवर त्याचा काही भागच दिसत होता आणि सॉफ्टवेअरमध्ये मिस्टेक दाखवल्या जात होत्या. काही विद्यार्थ्यांनी कमी चुका असूनही झिरो मार्क दाखवल्याची तक्रार केली. या सर्व प्रकारामुळे परीक्षा पारदर्शकपणे झाली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

लिपीक परीक्षेचा घोळ, दिपके येताच विद्यार्थ्यांना दिलासा काय काय घडलं?

पुनर्परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी रविवारी दुपारी 12 वाजता परीक्षा केंद्राबाहेर सुरू झालेले आंदोलन मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास स्थगित करण्यात आले. परीक्षेतील गोंधळाची उच्च न्यायालयाने दखल घेतली असून, परीक्षार्थीच्या मागण्या आठवडाभरात पूर्ण न केल्यास छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यव्यापी आंदोलन केले जाईल, अशी घोषणा सीजेपीचे अभिजित दीपके यांच्यासह परीक्षार्थीनी केली. पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर व रत्नाकर नवले यांनी रात्री 11 वाजता परीक्षार्थीशी संवाद साधला. परीक्षेचे संचालन उच्च न्यायालयाकडून केले जात आहे. त्याची दखल घेण्यात आलेली असल्यामुळे परीक्षार्थीनी आंदोलनाऐवजी उच्च न्यायालयात याचिका, निवेदनातून मागण्या कराव्यात असे या अधिकारीद्वयांनी आंदोलकांना सांगितले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत चर्चा करून आंदोलन स्थगित केले.

कीपॅड खराब; परीक्षा केंद्रावर Abhijeet Dipke जाताच काय घडलं? | 

घटनास्थळी अभिजीत दिपके यांनी विद्यार्थ्यांची बाजू जाणून घेतली आणि त्यांच्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या. विद्यार्थ्यांनी सांगितलं की, त्यांच्या तक्रारींबाबत अर्ज देण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यावर योग्य प्रकारे सही आणि शिक्का मिळत नसल्याचीही तक्रार करण्यात आली. पहिल्या शिफ्टमध्ये सुमारे 140 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. या शिफ्टमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात अडचणी आल्याचा दावा केला. यावेळी विद्यार्थ्यांनी एकत्र येत आपल्या मागण्या मांडल्या आणि जोपर्यंत त्यांच्या समस्यांवर निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन करण्याची भूमिका मांडण्यात आली.

बीडहून परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनीही परीक्षा केंद्रावरील व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. अर्चना शेंद्रे यांनी सांगितलं की, परीक्षा ऑन-स्क्रीन होणार असल्याची माहिती परीक्षेच्या काही दिवस आधी मिळाली आणि आता सॉफ्टवेअर, कीबोर्ड आणि पीसीमध्ये समस्या निर्माण झाल्याची तक्रार त्यांनी केली. शिवानी जगदाळे यांनीही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली. गजानन सुरभ आणि गजानन काटोळे यांनी कीबोर्ड, पीसी आणि सॉफ्टवेअर व्यवस्थित नसल्याचं सांगत पारदर्शकपणे टायपिंग टेस्ट घेण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी म्हणजे या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन पुन्हा परीक्षा घेण्यात यावी आणि व्यवस्थित पद्धतीने टायपिंग टेस्ट आयोजित करण्यात यावी.