Maharashtra Weather : राज्यात 'या' जिल्ह्यांवर मोठं संकट, IMD चा धो धो अलर्ट

मुंबई तक

• 05:00 AM • 17 Aug 2026

Maharashtra Weather : राज्यात पावसाची स्थिर स्थिती असून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. जाणून घ्या 17 ऑगस्ट 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज.  

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस

point

17 ऑगस्ट 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे..

Maharashtra Weather : राज्यात पावसाची स्थिर स्थिती असून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी हवामान विभागाने कोणताही अलर्ट वर्तविलेला नाही. अशातच जाणून घ्या 17 ऑगस्ट 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज हा पुढीलप्रमाणे वर्तविण्यात आलाय.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'मांसाहारींना घर नाही, शाकाहारींचे स्वागत', जाहिरातीवरून अमित ठाकरेंनी ब्रोकरची केली कानउघडणी

कोकण

पालघर आणि मुंबईत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता अधिक आहे. ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाची अधिकची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरीत वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. यापैकी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तविलाय. 

उत्तर महाराष्ट्र 

नंदुरबार आणि नाशिकमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. धुळ्यात हलका पाऊस आणि गडगडाटी वादळाची शक्यता आहे. जळगाव आणि अहिल्यानगरात हलका पाऊस राहणार असून गडगडाटी वादळाची शक्यता आहे. नाशिक घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.  

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत पाऊस हलक्या स्वरुपाचा राहण्याची शक्यता आहे. पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा यलो अलर्ट आहे. 

मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि जालना येथे मेघगर्जनेसह हलका पाऊस राहण्याची शक्यता आहे. परभणी, बीड आणि हिंगोलीमध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. नांदेड, लातूरमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊल पडण्याची शक्यता आहे. अकोलामध्ये कोणताही अलर्ट जारी केलेला नाही. 

हे ही वाचा : नागपूर: पोलीस अधिकाऱ्याने गळफास घेत उचललं टोकाचं पाऊल

विदर्भ 

अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ आणि नागपूरमध्ये हवामानाचा कोणताही अलर्ट वर्तविलेला नाही.