Govt Jobs : रेल्वेत 3,993 पदांची मेगा भरती, बक्कळ पगार; लगेच करा अर्ज

मुंबई तक

• 03:38 PM • 14 Aug 2026

भारतीय रेल्वे विभागाने विविध पदांच्या 3,993 जागांसाठी मेगा भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे ज्युनियर इंजिनिअर (JE) आणि डेपो मटेरियल सुपरिटेंडंट (DMS) या पदांवर योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

RRB Recruitment

RRB Recruitment

Google CTA

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : रेल्वेत 3,993 पदांची मेगा भरती

point

बक्कळ पगार

point

लगेच करा अर्ज

RRB Recruitment : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वे विभागाने विविध पदांच्या 3,993 जागांसाठी मेगा भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे ज्युनियर इंजिनिअर (JE) आणि डेपो मटेरियल सुपरिटेंडंट (DMS) या पदांवर योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता

रेल्वे भरती बोर्डाद्वारे (RRB) प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, ज्युनियर इंजिनिअर पदासाठी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, माहिती तंत्रज्ञान (IT), ऑटोमोबाईल आणि मेकाट्रॉनिक्स यांसारख्या विविध शाखांमधील इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तर डेपो मटेरियल सुपरिटेंडंट पदासाठी कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा असलेले उमेदवार पात्र ठरणार आहेत.

हे ही वाचा : चार महिन्यांवर लग्न आलं, पण असं काही घडलं की दोघांचा मृतदेह आढळला

वेतन किती मिळणार?

निवड झालेल्या उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगानुसार (Level 6) 35,400 रुपये प्रारंभिक मूळ वेतन (Initial Pay) आणि इतर सरकारी भत्ते दिले जातील. या भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे (1 जानेवारी 2027 रोजी) निश्चित करण्यात आली असून, नियमानुसार अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) मधील उमेदवारांना 5 वर्षे आणि इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 3 वर्षे वयोमर्याडेत सूट देण्यात आली आहे.

हे ही वाचा : रुग्णालयाच्या शौचालयात नर्सचा मृतदेह, नाईट ड्यूटीवर असताना काय घडलं?

अर्जाची शेवटची तारीख

या भरतीसाठी 13 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्जासाठी सामान्य, OBC आणि EWS वर्गवारीतील उमेदवारांना 500 रुपये तर SC, ST, माजी सैनिक, ट्रान्सजेंडर, EBC आणि महिला उमेदवारांना 250 रुपये परीक्षा शुल्क आकाराले जाईल. संपूर्ण भारतात कोणत्याही रेल्वे विभागात काम करण्यास उत्सुक असलेल्या आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी मुदतीपूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.