'हे' औषध तुमच्या घरात असेल तर लगेच कळवा, सरकार हाय अलर्टवर; अन्न औषध प्रशासनाकडून परिपत्रक जारी

Coldrif Cough Syrup News : 'हे' औषध तुमच्या घरात असेल तर लगेच कळवा, सरकार हाय अलर्टवर; अन्न औषध प्रशासनाकडून परिपत्रक जारी

Mumbai Tak

मुंबई तक

06 Oct 2025 (अपडेटेड: 06 Oct 2025, 09:30 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

Coldrif Cough Syrup घरात असेल तर लगेच कळवा, सरकार हाय अलर्टवर

point

अन्न औषध प्रशासनाकडून परिपत्रक जारी

Coldrif Cough Syrup News :  मध्य प्रदेशात कोल्डिफ सिरपमुळे चिमुकल्यांचा मृत्यू होण्याची मालिका सुरुच आहे. छिंदवाडानंतर बैतूल जिल्ह्यातही दोन मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.  या मुलांना  ‘कोल्ड्रिफ’ कफ (MP Cough Syrup) सिरपमुळे दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. तपासादरम्यान या सिरपमध्ये डायइथिलीन ग्लायकोल हा विषारी घटक आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन सर्व औषध विक्रेते, वितरक आणि नागरिकांना कोल्ड्रिप सिरप (बॅच क्र. SR-13) ची विक्री, वितरण व वापर तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागपुरात देखील तीन मुलांना या औषधामुळे जीव गमवावा लागलाय. दरम्यान, याबाबत आता राज्य सरकार अॅक्शन मोडवर आलं आहे. अन्न औषध प्रशासनाकडून कोल्ड्रिफ कप सिरपबाबत महत्त्वाचं परिपत्रक काढण्यात आलंय. 

हे वाचलं का?

अन्न औषध प्रशासनाकडून परिपत्रक जारी 

राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने या घटनेची गंभीर दखल घेत खबरदारीचा उपाय म्हणून टोल-फ्री हेल्पलाइन सुरू केला आहे. एप्रिल 2017  ते मे 2025 या कालावधीत तयार केलेले ‘कोल्ड्रिप सिरप’ (MP Cough Syrup) कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध असल्यास, त्याची माहिती तात्काळ या टोल-फ्री क्रमांकावर देण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा : 4 मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळून गेली, नवरा हमसून रडला; नंतर मुलांना घेऊन अंगावर काटा आणणारं पाऊल उचललं

छिंदवाडा येथे मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे झालेल्या अनेक चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः मृतदेहांचे शवविच्छेदन न झाल्यामुळे ही चिंता अधिक वाढली आहे. काही दिवसांपूर्वी योगिता नावाच्या मुलीचा मृत्यू झाला होता. किडनी खराब झाल्याने तिला प्राण गमवावे लागले होते. दरम्यान, तिचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी उकरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून काय समोर येणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

कोल्डरिफ कफ सिरप तयार करणाऱ्या कंपनीच्या कांचीपुरम येथील उत्पादन युनिटमध्ये झालेल्या तपासणीदरम्यान सिरपमध्ये 48.6% डायथिलीन ग्लायकोल आढळल्याचे समोर आले आहे, तर या घटकाचे प्रमाण 0.1% पेक्षा जास्त नसावे, असे नियमानुसार अपेक्षित आहे. अहवालानुसार, डायथिलीन ग्लायकोल हा अत्यंत विषारी पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले आहे. असा आरोप करण्यात येतो की, हे सिरप सेवन केल्यानंतर अनेक मुलांचे मूत्रपिंड निकामी झाले, ते गंभीर आजारी पडले आणि शेवटी त्यांचा मृत्यू झाला.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

शरद पवारांच्या आमदाराला मारहाण झाल्याची चर्चा, अखेर बापूसाहेब पठारे समोर; काय घडलं? सगळं सांगितलं

    follow whatsapp