दिवाळी बोनस म्हणून सोन पापडी दिली, संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या गेट समोर बॉक्स फेकले

diwali bonus news : दिवाळी बोनसऐवजी सोन पापडी दिली, कंपनीतील कर्मचारी संतप्त, गेटबाहेर बॉक्स फेकले; व्हिडिओ पाहा

Mumbai Tak

मुंबई तक

23 Oct 2025 (अपडेटेड: 23 Oct 2025, 09:16 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

दिवाळी बोनस म्हणून सोन पापडी दिली

point

संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या गेट समोर बॉक्स फेकले

diwali bonus news : हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील औद्योगिक परिसरात दिवाळीच्या निमित्ताने घडलेली एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. येथे एका कंपनीतील कर्मचाऱ्यांना बोनसऐवजी सोनपापडीचे डबे भेट म्हणून देण्यात आले. मात्र, या भेटीने आनंद मिळण्याऐवजी कामगारांचा संताप उफाळून आला. त्यांनी दिलेले सोनपापडीचे डबे कंपनीच्या गेटबाहेर फेकून आपला निषेध नोंदवला. या घटनेचा व्हिडिओ आता समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून, याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.

हे वाचलं का?

घटनेचा व्हिडिओ आणि कामगारांचा रोष

व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, डझनभर कर्मचारी कंपनीबाहेर जमलेले असून, त्यांच्या हातातील सोनपापडीचे डबे रागाने फेकत आहेत. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या निमित्ताने त्यांना बोनसची अपेक्षा होती. मात्र, बोनसऐवजी गोडधोड देऊन व्यवस्थापनाने त्यांचा अपमान केल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी हा आपल्या स्वाभिमानाचा प्रश्न मानत तीव्र नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा : तरुणाने तरुणीला विवाहास दिला नकार, तरूणी घर सोडून गेली, अखेर तलावात उडी घेत... जालना हादरलं!

व्यवस्थापनाविरोधात संतापाची लाट

या प्रकरणानंतर संपूर्ण औद्योगिक परिसरात चर्चेला उधाण आले आहे. काही जण कर्मचाऱ्यांच्या नाराजीला योग्य ठरवत आहेत, तर काहींच्या मते अशा प्रकारे भेटवस्तू फेकून दिल्याने परिस्थिती आणखी बिघडू शकते. अद्याप या ही घटना कोणत्या कंपनीत घडलीये? याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. प्रशासन किंवा श्रम विभागानेही अद्याप या प्रकरणात कोणतीही कारवाई केलेली नाही.

सोशल मीडियावर चर्चेला उधाण 

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांचं मत आहे की, वर्षभर मेहनत करणाऱ्या कामगारांना त्यांच्या परिश्रमाला साजेसा बोनस मिळायला हवा, फक्त औपचारिक भेटवस्तू नव्हे. कामगारांप्रती आदर व्यक्त करण्याचा खरा मार्ग म्हणजे त्यांना योग्य मोबदला देणे, असे अनेकांचे म्हणणे आहे. तर काहींच्या मते, व्यवस्थापनाने दिलेल्या भेटवस्तूंचा अपमान करणे योग्य नाही. असंतोष व्यक्त करण्यासाठी हा मार्ग योग्य नसल्याचे काहींनी नमूद केले.

बोनसवरून उफाळलेले प्रश्न

या घटनेनंतर पुन्हा एकदा दिवाळी बोनसच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे. अनेक कामगार संघटनांनीही या घटनेचा निषेध करत कामगारांच्या अपेक्षांचा आदर राखण्याचे आवाहन केले आहे. सोनीपतच्या या प्रकरणाने केवळ एका कंपनीवर प्रश्न उभा केला नाही, तर सणासुदीच्या काळात कामगारांच्या स्वाभिमानाचा मुद्दा अधोरेखित केला आहे. दिवाळीच्या आनंदात गोडवा आणण्यासाठी दिलेली सोनपापडीच अखेर नाराजीचे प्रतीक ठरली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ऐन दिवाळीत कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावर भीषण अपघात, भाऊबीजेपूर्वी भावासह बहिणीचा चिरडून मृत्यू

    follow whatsapp