Satara News : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कोयना विभागातील सोनाटा गावात रानगव्याच्या हल्ल्यात राघू जानू कदम या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळच्या सुमारास राघू जानू कदम या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी शेतीच्या कामासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर रानगव्याने हल्ला केला. या हल्लात शेतकऱ्याच्या छातीवर झडप घालत शेतकऱ्याला रक्तबंबाळ केलं. संबंधित शेतकऱ्याचे नाव राघू कदम असे आहे. या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : तरुणाने तरुणीला विवाहास दिला नकार, तरूणी घर सोडून गेली, अखेर तलावात उडी घेत... जालना हादरलं!
शेतकऱ्यावर रानगव्याच्या हल्ल्याने 105 गावं एकत्रित
या घटनेनं कोयना परिसरातील 105 गावांतील नागरिकांनी एकत्र येत वनविभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. सध्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्याबाबत ठोस भूमिका घेण्यात आली नव्हती असे सांगण्यात येत आहे. अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले, मात्र त्यांना लोकांच्या रोषाला समोरे जावे लागले.
कायम स्वरुपी उपाययोजना मिळावी अशी मागणी
नागरिकांनी चार दिवसांमध्ये आर्थिक मदत मिळावी आणि कायमस्वरुपी उपाययोजना केली जावी, अशी मागणीही केली होती. त्यानंतर आता अखेर वनविभाग घटनास्थळी दाखल झाले असता, त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : ऐन दिवाळीत कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावर भीषण अपघात, भाऊबीजेपूर्वी भावासह बहिणीचा चिरडून मृत्यू
रानगव्यांच्या वाढत्या त्रासावर स्थानिर प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे. जर योग्य तो निर्णय न घेतल्यास, कोयना परिसरातील 105 गावं रस्त्यावर उतरतील, असा इशारा स्थानिकांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
