'त्या' महिलेने थेट टॉयलेटमधील Video केला शेअर, असं काय घडलं...

Foreigner Shares Indian Train Video : भारतीय रेल्वेत प्रवासादरम्यान येणारे वाईट अनुभव लोक नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करतात. ट्रेनची झालेली दयनीय अवस्था व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर येत असते.

Udaipur City-Jaipur Intercity Express

Udaipur City-Jaipur Intercity Express Viral Video

मुंबई तक

29 Oct 2024 (अपडेटेड: 29 Oct 2024, 06:43 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय ट्रेनमधील धक्कादायक व्हिडीओ होतोय व्हायरल

point

परदेशी महिलेनं 'तो' व्हिडीओ इन्स्टाग्रामवर केला व्हायरल

point

व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरीही झाले थक्क

Foreigner Shares Indian Train Video : भारतीय रेल्वेत प्रवासादरम्यान येणारे वाईट अनुभव लोक नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करतात. ट्रेनची झालेली दयनीय अवस्था व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर येत असते. कधी अन्न पदार्थांमध्ये झुरळ, तर कधी एसी डब्ब्यात जनरल पॅसेंजर्सची झालेल्या गर्दीचे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल केले जातात.

हे वाचलं का?

अशातच एका परदेशी महिलेनं इंडियन ट्रेनमध्ये आलेला खराब अनुभव इन्स्टाग्रामच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर करत सर्वांसमोर आणला आहे. उदयपूर सिटी-जयपूर इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या परदेशी महिलेनं वेस्टर्न टॉयलेटची झालेली दयनीय अवस्था कॅमेरात कैद केली. हा व्हिडीओ व्हायरल होताच यूजर्सने भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

हे ही वाचा >>  Ladki Bahin Yojana:  महिलांनो! अजूनही 7500 मिळाले नाहीत? 'या' यादीत तुमचं नाव तपासा

इरिना मोरेनो नावाच्या परदेशी महिलेनं ट्रेनच्या टॉयलेटचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, ट्रेनमध्ये असलेल्या टॉयलेटची कशाप्रकारे दुर्दशा झालीय, तसच या टॉयलेटमध्ये घाणीचं साम्राज्य पसरल्याचंही या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, भारतीय ट्रेनमध्ये वेस्टर्न टॉयलेट, द्वीतीय श्रेणी. ट्रेन 12991. इरिनाने व्हिडीओ शेअर करताच लोकांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ

हे ही वाचा >> Fresh death threat against Salman Khan: सलमान खानसह मुंबईच्या 'या' आमदाराला जीवे मारण्याची पुन्हा धमकी, यामागे कुणाचा हात?

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला आतापर्यंत 59 लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. जवळपास 53 हजारांहून जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. तर अडीच हजार यूजर्सने हा व्हिडीओ रिशेअर केला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट करत म्हटलं, मोठ्या देशातली अशाप्रकारच्या अनेक गोष्टी असतात. तुम्हाला स्वस्तात मस्त प्रवास हवा होता, म्हणून तुम्ही या ट्रेनने प्रवास केला. अन्य एका यूजरने म्हटलं, पुढच्या वेळी चांगल्या बजेटमध्ये भारतात या. म्हणजे वंदे भारत सारख्या चांगल्या ट्रेनमध्ये तुम्हाला प्रवास करता येईल.

    follow whatsapp