Gold Price: सोन्याचे भाव घसरले! थोडी का होईना चांदीही झाली स्वस्त; पाहा आजचा 24 कॅरेटचा भाव...

Gold-Silver Rate : सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, (सोमवार 2 सप्टेंबर) सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण झाली आहे.

Mumbai Tak

रोहिणी ठोंबरे

02 Sep 2024 (अपडेटेड: 02 Sep 2024, 12:24 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण झाली आहे.

point

सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत सतत अस्थिरता पाहायला मिळत आहे.

point

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

Gold-Silver Rate : सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, (सोमवार 2 सप्टेंबर) सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण झाली आहे. सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत सतत अस्थिरता पाहायला मिळत असताना सणासुदीच्या तोंडावर आता सोन्याच्या किंमतीत किंचित घट झाली आहे. चला मग आजच्या किंमती जाणून घेऊयात. (gold-silver prices fell today 02 September 2024 in maharashtra know the details)

हे वाचलं का?

Goodreturns वेबसाईटनुसार, रविवारी (02 सप्टेंबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 73, 040 रूपये होता. पण आज यामध्ये 270 रूपयांनी घट झाली असून 72,770 रूपये किंमत झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या भावातही 250 रुपयांनी घट झाली आहे. त्याचवेळी, एक किलो चांदीचा भाव 1000 रूपयांनी घसरला आहे. एक किलो चांदीची किंमत 86,000 रूपये इतकी झाली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने दागिन्यांच्या किंमती सतत बदलत असतात.

हेही वाचा : Vanraj Andekar: लाईट गेली अन् गोळ्याच झाडल्या! कोयत्यानेही केले वार; NCP माजी नगरसेवकाच्या हत्येचा थरारक Video

 

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

मुंबई

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,700 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,770 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,570 रूपये आहे.

पुणे

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,700 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,770 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,570 रूपये आहे.

नागपूर

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,700 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,770 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,570 रूपये आहे.

नाशिक

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,730 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,800 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,600 रूपये आहे.

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

हेही वाचा : Sharad Pawar : "शिवरायांची तुलना कुणाशी...", शरद पवारांनी PM मोदींना सुनावलं

22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.