दहावी पास आणि ड्रायव्हिंग लायसन्स असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी, SSB मध्ये 1060 पदांची भरती, 'असा' करा अर्ज

मुंबई तक

• 11:23 AM • 27 Mar 2026

Government Job : देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या सशस्त्र सीमा बलाने (SSB) कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबलच्या विविध रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 1060 जागा भरल्या जाणार आहेत.

Government Job

Government Job

Google CTA

बातम्या हायलाइट

point

दहावी पास आणि ड्रायव्हिंग लायसन्स असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी

point

SSB मध्ये 1060 पदांची भरती

point

'असा' करा अर्ज

Government Job : देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या सशस्त्र सीमा बलाने (SSB) कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबलच्या विविध रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 1060 जागा भरल्या जाणार असून, यामध्ये कॉन्स्टेबलच्या 827 आणि हेड कॉन्स्टेबलच्या 233 पदांचा समावेश आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे वाचलं का?

काय आहे पात्रता?

या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. विशेषतः कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे अवजड वाहन चालक परवाना (Heavy Vehicle Driving License) असणे आवश्यक आहे. याशिवाय, तांत्रिक पदांसाठी संबंधित ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र किंवा कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. अर्ज प्रक्रिया 21 मार्च 2026 पासून सुरू झाली असून 20 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात अवकाळीचं दुहेरी संकट, 'या' जिल्ह्यांत पाऊस कोसळण्याची शक्यता, महत्त्वाचा अलर्ट

'अशी' असेल परीक्षा

निवड प्रक्रिया एकूण चार टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात उमेदवारांची शारीरिक चाचणी आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी घेतली जाईल. या चाचणीत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यात लेखी परीक्षेला सामोरे जावे लागेल, जी संगणक आधारित  किंवा ओएमआर शीटवर आधारित असू शकते. लेखी परीक्षेनंतर कागदपत्र पडताळणी केली जाईल आणि अंतिम निवडीपूर्वी उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करून त्यांची शारीरिक पात्रता तपासली जाईल.

हे ही वाचा : Petrol Pump Rules: एका दिवसात 'एवढं' पेट्रोल-डिझेल करू शकता खरेदी.. नेमका नियम काय?

'असा' करा अर्ज

इच्छुक उमेदवारांनी 'ssbrectt.gov.in' या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा. होमपेजवर संबंधित भरती लिंकवर क्लिक करून आपली वैयक्तिक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. त्यानंतर अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करावा. अर्ज भरताना कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज पूर्ण करण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.