Gyanvapi case : मुस्लिम पक्षकारांना मोठा झटका, तळघरातील पूजेबद्दल हायकोर्टाचा निर्णय काय?

भागवत हिरेकर

26 Feb 2024 (अपडेटेड: 26 Feb 2024, 12:35 PM)

Allahabad high court judgement on gyanvapi : ज्ञानव्यापी प्रकरणात वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालाला मुस्लिम पक्षकारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

अलाहाबाद उच्च न्यायालयात मुस्लिम पक्षकारांना धक्का बसला आहे.

Allahabad High Court has given its verdict in the Gyanvapi case.

follow google news

Gyanvapi case Verdict : ज्ञानव्यापी प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने मुस्लिम पक्षकारांना झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षकारांची स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळताना व्यास तळघरात हिंदूंची पूजा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (Big blow to Muslim side from Allahabad High Court)

हे वाचलं का?

वाराणसी जिल्हा न्यायालयानेही ज्ञानव्यापी प्रकरणात हिंदूंच्या बाजूने निकाल दिला होता. त्याविरोधात मुस्लिम पक्षकाराने अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, येथेही मुस्लिम पक्षकारांना दिलासा मिळू शकला नाही. 

हेही वाचा >> "हग्रलेख आजच लिहून ठेवा", आशिष शेलार संजय राऊतांवर का संतापले?

अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानव्यापी मशिदीच्या व्यास तळघरात हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार राखून ठेवला. मात्र, सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्याय मुस्लिम पक्षकारांसाठी अजूनही खुला आहे आणि त्यामुळे कदाचित मुस्लिम पक्षकार आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावू शकतात.

पुजेला स्थगिती देण्याची मुस्लिम पक्षाची मागणी

हिंदू-मुस्लिम दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून उच्च न्यायालयाने निर्णय आधीच राखून ठेवला होता. वाराणसी न्यायालयाच्या आदेशाला अंजुमन व्यवस्थापन समितीने आव्हान दिले होते, ज्यामध्ये पूजेला स्थगिती देण्यात यावी असे म्हटले होते.

मुस्लिम पक्षकारांनी न्यायालयाला काय सांगितले?

मुस्लिम पक्षकारांनी असा दावा केला की, जिल्हाधिकाऱ्यांना वाराणसी कोर्टाने रिसीव्हर म्हणून नियुक्त केले आहे, जे आधीपासूनच काशी विश्वनाथ मंदिराचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांची नियुक्ती होऊ शकत नाही. मुस्लीम पक्षाने असेही म्हटले आहे की, कागदपत्रात कोणत्याही तळघराचा उल्लेख नाही. व्यासजींनी पुजेचे अधिकार आधीच ट्रस्टकडे हस्तांतरित केले आहेत. त्यांना अर्ज दाखल करण्याचा अधिकार नाहीत,  असे मुस्लिम पक्षकारांनी न्यायालयता सांगितले. 

आदेशानंतर तळघर उघडले

ज्ञानव्यापी मशिदीच्या सर्वेक्षणानंतर तळघर उघडण्यात आले. शैलेंद्र कुमार पाठक यांनीही या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर 31 जानेवारी रोजी जिल्हा न्यायाधीशांच्या आदेशानुसार हिंदू पक्षाला पूजा करण्याचा अधिकार देण्यात आला होता. जिल्हा न्यायाधीशांच्या आदेशानंतर काशीविश्वनाथ ट्रस्टने पूजा सुरू केली होती.

हेही वाचा >> '...पाठीत खंजीर खुपसणे असा उद्देश नव्हता', अजित पवारांचं मोठं पत्र

ज्ञानव्यापी तळघराचा वाद काय?

खरं तर, पूजा सुरू होण्यापूर्वी, हिंदू बाजूने दावा केला होता की, नोव्हेंबर 1993 पूर्वी तत्कालीन राज्य सरकारने व्यास तळघरात पूजा थांबवली होती. जे पुन्हा सुरू करण्याचे अधिकार दिले पाहिजेत. त्याच वेळी, मुस्लिम बाजूने प्रार्थनास्थळ कायद्याचा हवाला देत याचिका फेटाळण्याची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने मुस्लिम बाजूची याचिका फेटाळून लावत हिंदू बाजूने ज्ञानव्यापीच्या व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार दिला.

    follow whatsapp