Maharashtra HSC Result 2023: मोबाइल, mahresults.nic.in वेबसाइटवर कसा पाहाल निकाल?

मुंबई तक

24 May 2023 (अपडेटेड: 25 May 2023, 06:43 AM)

HSC Result 2023 Online and Offline: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra Board HSC Result 2023) MSBSHSE बारावीचा निकाल निकाल 25 मे 2023 रोजी दुपारी 2 वाजता जाहीर होणार आहे.

how to check hsc result on website mahresultsnicin and offline maharashtra hsc results 2023

how to check hsc result on website mahresultsnicin and offline maharashtra hsc results 2023

follow google news

HSC Results 2023: मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या MSBSHSE बारावीचा निकाल (HSC Result) हा आज (25 मे 2023) दुपारी 2 वाजता जाहीर होणार आहे. आता निकाल जाहीर होण्यासाठी काही अवघे तास उरल्यामुळे विद्यार्थ्यांची बरीच धाकधूक वाढली आहे. या निकालाकडे आता लाखो विद्यार्थी-पालकाचं लक्ष आहे. (how to check hsc result on website mahresultsnicin and offline maharashtra hsc results 2023)

हे वाचलं का?

12 वीच्या विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाइनच पाहता येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे ऑनलाइनच आपल्याला निकाल पाहता येईल.

महाराष्ट्र बारावी बोर्डाने बारावीची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च 2023 मध्ये पार पडली. बारावीच्या परीक्षेचा निकाल दरवर्षी साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच जाहीर केला जातो. तीच परंपरा बोर्डाने यंदाही कायम ठेवली आहे.

दरम्यान, यंदाच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. पाहा बारावीचा निकाल आपण ऑनलाइन आणि ऑफलाइन म्हणजेच मोबाइलवर कसा पाहू शकता.

महाराष्ट्र बारावी निकाल 2023 – mahresult.nic.in वर आपला निकाल कसा पाहाल?

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने HSCचा निकाल result.mh-ssc.ac.in वर जाहीर होईल.
  • HSC Result 2023 – निकाल नेमका कसा पाहाल?
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे बारावी (HSC) या बोर्ड परीक्षांचे निकाल mahahsscboard.in यावर जाहीर करणार आहे.
  • नेमका निकाल कसा पाहता येणार?
  • सगळ्यात आधी MSBSHSEच्या Mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन
  • होम पेजवर असलेल्या महाराष्ट्र बारावीचा निकाल 2023 या लिंकवर क्लिक करा.
  • लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रिझल्ट पेज येईल.
  • या रिझल्ट पेजमध्ये विद्यार्थ्यांना त्यांचा सीट नंबर तिथे टाका.
  • त्यानंतर पुढच्या टॅबमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या आईच्या नावाचे पहिले तीन अक्षर टाकावे लागणार आहे आणि त्यानंतरच त्यांना Submit हे बटण दाबावं.
  • उदाहरणार्थ, तुमचा सीट नंबर M768854 असेल आणि तुमच्या आईचे नाव प्रिया असं असेल तर तुम्ही M768854 हा तुमचा सीट नंबर टाकून पुढच्या बॉक्समध्ये आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच PRI असं टाकावं लागेल.

Maharashtra HSC Result 2023: मोबाइलवरुन कसा पाहाल निकाल?

बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोबाइलवरुन ऑफलाइन पद्धतीने देखील बारावीचा निकाल पाहता येईल. अनेक वेळेस निकाल जाहीर झाल्यानंतर बहुतेक वेबसाइट या क्रॅश होते. तसंच इंटरनेट उपलब्ध नसेल तर HSC निकाल हा त्यांना SMS द्वारे पाहाता येणार आहे.

SMSद्वारे एसएससीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना “MHHSC” असं टाकून 57766 वर SMS सेंड करायचा आहे. त्यानंतर निकाल त्यांच्या फोनवर SMSच्या माध्यमातून दिसेल.

    follow whatsapp