Govt Jobs : पदवीधरांना मोठी संधी, 'या' सरकारी बँकेत भरती सुरु, लगेच अर्ज करा

मुंबई तक

07 Jul 2026 (अपडेटेड: 07 Jul 2026, 04:46 PM)

इंडियन ओव्हरसीज बँकेत मोठी संधी उपलब्ध झाली आहे. बँकेने संपूर्ण भारतातील आपल्या विविध शाखांसाठी तब्बल 750 'अप्रेंटिस' पदांची घोषणा केली आहे. यासाठीचे निकष काय आहेत, जाणून घ्या.

IOB Recruitment

IOB Recruitment

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पदवीधरांना मोठी संधी

point

'या' सरकारी बँकेत भरती सुरु

point

लगेच अर्ज करा

IOB Recruitment : इंडियन ओव्हरसीज बँकेत (IOB) रोजगाराची एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. बँकेने संपूर्ण भारतातील आपल्या विविध शाखांसाठी तब्बल 750 'अप्रेंटिस' (प्रशिक्षणार्थी) पदांची घोषणा केली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै आहे. बँकिंग क्षेत्रात आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या आणि पदवी पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि उत्तम सुवर्णसंधी मानली जात आहे.

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता काय?

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. वयाची अट 1 जुलै 2026 रोजी किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे दरम्यान असावी. नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे, ज्यामध्ये अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 3 वर्षांची सूट मिळणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही नोकरी (प्रशिक्षण) मिळू शकते.

हे ही वाचा : नाशिकमध्ये रेड अलर्ट, त्र्यंबकेश्वर मंदिर बंद; व्हिडिओ व्हायरल

अर्जाची अंतिम तारीख

अर्ज प्रक्रियेसाठी खुल्या आणि ओबीसी (General/OBC) प्रवर्गातील उमेदवारांना 944 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल. तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गासाठी 708 रुपये आणि दिव्यांग (PWD) उमेदवारांसाठी 472 रुपये फी निश्चित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, इच्छुकांना 20 जुलै पूर्वी आपले अर्ज सादर करावे लागणार आहेत. या भरतीसाठीची अधिकृत परीक्षा 2 ऑगस्ट रोजी घेतली जाणार आहे, त्यामुळे उमेदवारांना अभ्यासासाठी मर्यादित वेळ मिळणार आहे.

हे ही वाचा : मुंबईची खबर : 24 तासात मुंबईत कोसळली 523 झाडं, काँक्रिटीकरणचा फटका बसतोय का?

मानधन किती मिळणार?

निवड झालेल्या अप्रेंटिस उमेदवारांना एक वर्षाच्या कराराच्या कालावधीसाठी दरमहा स्टायपेंड (विद्यावेतन) दिला जाईल. हा स्टायपेंड नोकरीच्या ठिकाणानुसार वेगवेगळ्या श्रेणीत विभागण्यात आला आहे. यामध्ये मेट्रो शहरांमधील शाखांसाठी दरमहा 15,500 रुपये, शहरी (अर्बन) भागातील शाखांसाठी 14,500 रुपये, तर निमशहरी आणि ग्रामीण (Semi-Urban / Rural) भागातील शाखांसाठी दरमहा 14,000 रुपये स्टायपेंड दिला जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वेळेत अधिकृत वेबसाइटला ( www.iob.bank.in) भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा.