Indurikar Maharaj emotional will decide to leave Kirtan field : महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडला. शिवाय या कार्यक्रम मात्र, या समारंभानंतर सोशल मीडियावरून त्यांच्या कुटुंबावर झालेल्या वैयक्तिक टीकांनी महाराज व्यथित झाले आहेत. या सततच्या टीकांमुळे त्यांनी कीर्तन क्षेत्रातून दूर होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले असून, त्यांचा यासंबंधीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT
इंदुरीकर महाराज काय म्हणाले?
महाराज म्हणाले, “माझी मुलं लहान असताना आठ-आठ दिवस भेट व्हायची नाही. आणि आज लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीने काय कपडे घातले यावरून लोक कमेंट्स करत आहेत. यापेक्षा वाईट काय असू शकतं? चार दिवसांपासून लोक तिच्या कपड्यांवर बातम्या बनवत आहेत. पण तिच्या बापावर, माझ्यावर बोट दाखवत आहेत. माझ्या मुला-मुलींचा यात काय दोष?”
हेही वाचा : मोठी बातमी : भाजप आमदार चित्रा वाघ यांच्याविरोधात शिरूर-कासार न्यायालयाकडून वॉरंट जारी, नेमकं प्रकरण काय?
ते पुढे म्हणाले, “या कॅमेरावाल्यांनी आणि काही लोकांनी माझं जगणंच अवघड केलंय. तुमच्याही मुली असतात, त्यांच्या कपड्यांवर कोणी बोललं तर काय वाटेल? साखरपुड्यात कपडे वराच्या बाजूने घेतले जातात की वधूच्या? मग हे कपडे कोणाचे होते यावर लोकांनी विचार न करता चर्चा सुरू केली. एवढं करूनही लोकांना लाज वाटत नाही. माणूस नालायक असू शकतो, पण इतका का खाली जावा?”
महाराज पुढे भावनिक होत म्हणाले, “मी 31 वर्ष कीर्तन केलं, लोकांच्या शिव्या सहन केल्या, तरीही चांगलं केलं. पण आता या गोष्टी माझ्या घरापर्यंत आल्या आहेत, त्यामुळे यात मजा राहिली नाही. माझ्याबद्दल काहीही बोललं असतं, पण कुटुंबावर बोलणं चुकीचं आहे. मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे, पण आता वाटतं, की इंदुरीकरनेच कीर्तनं थांबवली पाहिजेत. लोकांनी बोलायला सुरुवात केली आहे, मग फेटा ठेवून देणंच बरं. काही दिवसांपासून विचार करतोय... दोन-तीन दिवसांत निर्णय घेणार आहे.” महाराजांनी स्पष्ट सांगितले की, “मी समर्थ आहे उत्तर द्यायला, पण हे सर्व कुटुंबावर आलं की त्याचं दुःख जास्त होतं. त्यामुळे आता थांबतोय.”
इतर महत्त्वाच्या बातम्या ट
ADVERTISEMENT











