‘महागाई वाढेल; विशेष काय?’, सामनातून केंद्र सरकारवर आगपाखड

मुंबई तक

• 02:29 AM • 16 Nov 2023

आजच्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून महागाईवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने महागाईचे संकेत दिल्यानंतर सामनाच्या अग्रलेखातून महागाईवरुन अनेक सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.

Inflation will increase Samana newspaper criticized central government hinting increase petrol and gas prices

Inflation will increase Samana newspaper criticized central government hinting increase petrol and gas prices

follow google news

Saamana Editorial: दिवाळी संपता संपताच सामन्य माणसाच्या आयुष्यात महागाईचा (inflation) बॉम्ब फोडण्याचा प्रकार केंद्र सरकारने केला असल्याचा घणाघात सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. दिवाळी सण संपतानाच केंद्र सरकारने (Central Govt) महागाईचे संकेत दिल्याने सामनाच्या अग्रलेखातून यूपीए सरकारच्या (UPA Government) नावाने शिमगा करणारेच मागील नऊ वर्षात सत्तेत आहे. तुमच्या कार्यकाळात ही महागाई कमी का झाली नाही असा खडा सवाल केंद्राला करण्यात आला आहे. सामनाच्या अग्रलेखातून भाजप (BJP) सत्तेत आल्यापासून महागाईबाबत घेत असलेले निर्णय आणि निवडणुका आल्यानंतर गॅस (Gas) आणि पेट्रोलची दरवाढ (Petrol price hike) रोखायची आणि त्यांच्या दरात कपात करायची, महागाई कमी केल्याचे ढोल पिटायचे व निवडणुका झाल्यानंतर महागाई जैसे थे करायची असाच प्रकार केंद्र सरकारकडून चालू असल्याची टीकाही या अग्रलेखातून करण्यात आली आहे. (Inflation will increase samana newspaper criticized central government hinting increase petrol and gas prices)

हे वाचलं का?

फक्त दरवाढच

दिवाळी सणात भाऊबीज पार पडल्यानंतर केंद्र सरकारकडून महागाई होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यावरूनच सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारच्या धोरणावर जोरदार टीका करण्यात आली आहे. या अग्रलेखातून ऑक्टोबर महिन्यात घाऊक महागाईचा दर 0.52 टक्के होता. तर सलग सातव्या महिन्यात हा दर शून्याच्या खाली आला असल्याचेही दाखवून देण्यात आले आहे. त्यातच घाऊक महागाई वाढली तर किरकोळ महागाईही वाढणार हे स्पष्टच असल्याचे सांगत त्याचा फटका भविष्यात सामान्य माणसाला बसणार असल्याचेही सामनाच्या अग्रलेखातून सांगण्यात आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून फक्त दरवाढच होत असल्याचे सांगत टीका करण्यात आली आहे.

सामान्य जनतेचा ‘अवसानघात’

दरवर्षीप्रमाणे या वर्षी पाऊस झाला नाही. त्याचा फटका देशातील सामान्य जनतेला बसला आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. कमी झालेला पाऊस, लांबलेला मान्सून, बसलेले अवकाळीचे तडाखे, कमी झालेली खरिपाची पेरणी आणि धरणातील कमी पाणीसाठ्यामुळे रब्बी हंगामाला त्याचा मोठा फटका बसला आहे. त्यातच आता दिवाळीचा सण संपता संपता केंद्राने पुन्हा महागाईचे संकेत दिल्याने त्याचा सामान्य जनतेला फटका बसणार आहे. त्यामुळेच दिवाळीच्या ऐन सणात महागाईकडे दुर्लक्ष करत उसने अवसान आणत जनतेने दिवाळी साजरी केली असल्याचेही सामनाच्या अग्रलेखातून सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा >> Mohammed Shami : वानखेडेवर शमीच्या गोलंदाजीचे वादळ, 7 विकेट्स घेत मोठा रेकॉर्ड

महागाई वाढणार

गेल्या नऊ वर्षापासून हे भाजप सरकार सत्तेत आहे, मात्र यूपीएच्या काळात याच भाजपकडून महंगाई डायन म्हणत जोरदार हल्लाबोल केला जात होता. मात्र आता दिवाळीच्या ऐन सणात याच केंद्र सरकारने पुन्हा एकदा महागाईचे संकेत दिल्याने सामनाच्या अग्रलेखातून आता अनेक सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.

त्यात विशेष काय

केंद्र सरकारकडून महागाईचे संकेत देण्यात आले असले तरी त्यामध्ये विशेष काय असा सवाल जनसामान्यांना पडला आहे असल्याचे मत सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आले आहे. कारण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे महागाईचा फटका सामान्य नागरिकांना दिला जात असतो. तर निवडणुका आल्यानंतर मात्र इंधन दरवाढ रोखून महागाई कमी केल्याचे नाटक हे सरकार करत असल्याचे दाखवत असते. त्यामुळे आता या सरकारने महागाईचे संकेत दिले असले तरी त्यात विशेष काय असा खडा सवालही सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

दिवाळीच्या उत्साहावर विरजण

भाऊबीज झाल्यानंतर केंद्राने महागाई होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे दिवाळीच्या उत्साहावरच विरजण पडल्याचे सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे निवडणुका नसताना महागाई, दरवाढ करणे ही भाजपची पद्धत असल्याचे सांगत महागाईचे संकेत दिले तरी त्यामध्ये विशेष असं काही नाही. मात्र त्यामुळे सामान्य माणसांच्या उत्साहावर विरजण पडल्याचे त्यामध्ये म्हटले आहे.

तुम्ही सत्तेत का बसला

ज्या यूपीए सरकारच्या काळात महंगाई डायन म्हणत टीका केली जात होती. भाजप सत्तेत आल्यानंतर महागाई कमी करू असं अश्वासन दिले जात होते. त्या केंद्रातील मोदी सरकारने वेळोवेळी महागाई करून जनसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. महागाईवरून यूपीए सरकारच्या नावाने शिमगा केला आहे तेच भाजप सरकार गेल्या नऊ वर्षापासून सत्तेत आहे. तरीही महागाई कमी झाली की ती सर्वसामान्यांच्या मानगुटीवरून उतरली नाही. जर महागाई कमी होत नसेल तर मग तुम्ही सत्तेत बसला का असा खडा सवाल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

    follow whatsapp