Maharashtra Weather Today (22nd Mar 2025): महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सूर्यनारायण तापू लागले आहे. त्यामुळे उष्णता बरीच वाढत आहे. मात्र, आज (22 मार्च) राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात काहीसं वेगवेगळं वातावरण राहणार आहे. म्हणजे काही ठिकाणी प्रचंड उष्णता तर काही जिल्ह्यात कोरडं, काही जिल्ह्यात ढगाळ तर काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून पावसाच्या सरी येत असल्याचं पाहायला मिळतंय. मार्चच्या सुरुवातीलाच मुंबईसह अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढल्याचे दिसतंय. मात्र, आता हवामान खात्याने वातावरणात झालेल्या बदलांचे अंदाज वर्तवले आहे. त्यामुळे या येत्या काही दिवसात वातावरण कोरडं आणि ढगाळ असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे ही वाचा>> Pune : लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी झुडपात सापडला तरूणीचा मृतदेह, पोलीस चौकशीत समोर आली खळबळजनक घटना
हवामान विभागाचा अंदाज
मुंबईत सूर्य तापू लागल्याने मुंबईकरांना घामाचा धारा लागल्या आहेत. मात्र, असं असलं तरी येत्या दोन-तीन दिवसात वातावरण काहीसं ढगाळ असेल. त्यामुळे उष्मा देखील कमी होण्याची शक्यता आहे. पण पुन्हा मुंबईत प्रचंड ऊन असण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यातील कोणत्या विभागात कसं असेल तापमान जाणून घ्या:
विदर्भ: विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी 40-50 किमी वेगाने विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी 40-50 किमी वेगाने विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वारा होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा>> अंतराळवीर स्पेस सेंटरमध्ये आंघोळ करतात का? वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
कोकण: कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा: दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग), हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई: पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज. शहर आणि उपनगरात सकाळच्या वेळी धुके राहील आणि दुपार/संध्याकाळपर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६°C आणि २४°C च्या आसपास असेल.
- वाशिम येथे ४०.४°C कमाल तापमानाची नोंद झाली.
- पुणे येथे १७.०°C हे सर्वात कमी किमान तापमान होते.
ADVERTISEMENT
