Maharashtra Weather Today : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. काही जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामान, तर काही ठिकाणी कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली. काल बुधवारी 14 मे रोजी मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
ADVERTISEMENT
जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेड या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि 50-60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज बांधण्यात आला होता. अशातच महाराष्ट्रात आज गुरुवारी 15 मे 2025 रोजी हवामान कसं असणार आहे, याबाबत जाणून घ्या सविस्तार माहिती.
भारतीय प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, 50-60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.मराठवाडा जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 50-60 किमी प्रतितास वेगाने हलका पाऊस, 50-60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. कोकण-गोवा जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा >> भारतात खळबळ उडवून देणारी Inside स्टोरी, पाकिस्तान दहशतवादी मसूद अझहरला देणार तब्बल 14 कोटी!
दरम्यान, बुधवारी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरच्या घाट परिसरातही पाऊस पडण्याची शक्यता सांगण्यात आली होती. तर काही भागांना यलो आणि काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. पुणे शहराला यलो अलर्ट देण्यात आला होता. तसच या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.
हे ही वाचा >> 'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री भारताचा होता प्रचंड मोठा प्लॅन, कराचीत घडणार होतं भयंकर.. वाचा ही Inside स्टोरी
ADVERTISEMENT
