जालना : पत्नीच्या पोटात वाढत होतं बाळ, कंटेनरने धडक देत अख्ख कुटुंबच चिरडलं, अंगावर काटा आणणारा भीषण अपघात

Jalna Accident : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील महाकाळ गावाला लागून असलेल्या धुळे - सोलापूर राष्ट्रीय माहामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली.

Jalna Crime News

Jalna Crime News

मुंबई तक

• 01:41 PM • 07 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

धुळे - सोलापूर राष्ट्रीय माहामार्गावर भीषण अपघात

point

अख्ख कुटुंब कंटेनरखाली चिरडलं गेलं

Jalna Accident : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील महाकाळ गावाला लागून असलेल्या धुळे - सोलापूर राष्ट्रीय माहामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली. या अपघातात एक दुचाकी कंटेनरखाली चिरडली गेली आहे. ही घटना 6 ऑक्टोबर रोजी सोमवारी घडली. या घटनेनं जालना जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुंबई : 'तो आला त्यानं पार्सल दिलं अन् माझ्या छातीला हात लावला', ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयचं वासनांध कृत्य CCTV मध्ये कैद

अपघातात कुटुंब उद्ध्वस्त 

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पती-पत्नी आणि एका चार वर्षाच्या मुलाचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. हे कुटुंब नातेवाईकाच्या लग्नाहून घरी जात होते. तेव्हाच एका भरधाव कंटेरने एका दुचाकीला जोराची टोकर दिला आणि त्या अपघातात हे तिघेरी जागीच ठार झाले. मृतांमध्ये विकास अण्णासाहेब जाधव (वय 28), पत्नी साक्षी विकास जाधव (वय 22) आणि मुलगा अथर्व (वय 4) हे तिघांचा या अपघातात मृत्यू झाला. 

चिखलठाणा, छत्रपती संभाजीनगराहून दुचाकी एमएच 20 एचसी 3031 वरून घरी परतत होते. तेव्हाचत शहागडवरून वडीगोद्रीकडे जाणाऱ्या  एनएल 01, जी 9322 नंबर प्लेट असणाऱ्या एका कंटेनरने दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जोराची होती की, कंटेनरच्या एका ठोकरमध्येच तिघेही 50 फूटापर्यंत ठोकर देत नेलं आणि नंतर कंटेनरही डिव्हायडरवर चढला. या भीषण अपघातात तिघांचाही मृत्यू झाला आहे. 

हे ही वाचा : '...तर त्याच्या कंबरेत लाथ घाला, भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचं वक्तव्य; तडीपार गुंडाच्या कार्यक्रमाला उपस्थिती

पोटात वाढत होतं बाळ आणि अपघात

 

संबंधित प्रकरणात नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत साक्षी जाधव या गरोदर होत्या. एका क्षणातंच कुटुंबावर काळाने घाला घातल्याचं मन हेलावून टाकणारा अपघात होता. मृतदेह हे पाचोड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. तर वडील विकास यांचा मृतदेह छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात हलवण्यात आला. 

    follow whatsapp