Kalyan Crime : कल्याणमध्ये मन हेलावून टाकणारं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका पीडितेवर तब्बल सात जणांनी गेली पाच महिने लैंगिक शोषण केलं. सुरुवातीला एका तरुणाने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. त्याचा व्हिडिओ दुसऱ्या एका मुलाकडे गेला होता. त्यानंतर तिसऱ्या आणि तिसऱ्याकडून चौथ्या मुलाकडे व्हिडिओ गेला. अशा एकूण सात जणांकडे व्हिडिओ पोहोचल्याने या सातही नराधमांनी आळीपाळीने बलात्कार केला. संतापजनक बाब म्हणजे सर्वच नराधमांनी व्हिडिओ रेकॉर्ड केले, त्यानंतर ते व्हिडिओ आता तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचले आणि हे प्रकरण समोर आलं. याप्रकरणात पोलिसांनी सातही जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : राज्याला पावसानं झोडपलं, कोकणासह मराठवाड्यात शेतकऱ्यांची उडाली दाणादाण, आजची हवामान परिस्थिती वाचा
तब्बल सात जणांनी पीडितेवचं केलं लैंगिक शोषण
दरम्यान, पीडित तरुणी ही महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या परिसरात आईसोबत राहते, पीडित तरुणी ही एका विद्यालयात शिक्षण घेते. तिची ओळख राहुल भोईर नावाच्या तरुणासोबत झाली होती. ओळखीनंतर दोघांचे नात्यात रुपांतर झाले होते, नंतर त्यांचे प्रेम झाले होते. त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचाराचं सत्र सुरुच ठेवलं आणि व्हिडिओ शूट करून दुसरा मित्र देवा पाटीलला पाठवले. देवा पाटीलने मुलीशी संपर्क साधल्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. ब्लॅकमेल करणाऱ्या देवा पाटीलने तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेत.
आरोपींची नावे आली समोर
हा व्हिडिओ पुढे इतर काही मुलांपर्यंत पोहोचला, ज्यात अजित सुरवसे, गौरव सुरवसे, हर्षल पोळसे, जयेश मोरे आणि किरण सुरवसे यांनाही पाठवण्यात आला. याच मुलांनी शरीरसंबंधाची मागणी केली होती. जर शरीरसुख मिळालं नाही,तर व्हिडिओ व्हायरल करेल असं सांगितलं. हे नराधम भिवंडी आणि मुरबाजडमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. एवढंच नाही,तर आरोपींच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचं सांगण्यात येत आहे. संबंधित प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी सात जणांना अटक केली होती. या एकूण सातही आरोपींना कल्याणच्या पोक्सो अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने सातही आरोपींना न्यायालयातील कोठडीत ठेवले होते.
हे ही वाचा : भावाने बहिणीला केलं विधवा, दाजीवर धारधार शस्त्राने केले सपासप वार, 'त्या' कारणावरून उजवा हात कोपऱ्यापासून छाटला
बलात्कारातून पीडित तरुणी गर्भवती
हे प्रकरण इथंवर न थांबता चौकशीदरम्यान, एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या सामूहिक बलात्कारातूनच अल्पवयीन पीडित मुलगी गर्भवती राहिली. तिच्यावर सतत पाच महिने सुरु असलेल्या अत्याचाराने तिची मानसिक स्थिती आणखीनच खचून गेली होती. कुटुंबियांनी अनेकदा तिला विचारण्याचा प्रयत्न केला, पण तिने कसलंही अक्षर तोंडून काढलं नाही. पण नंतर ही घटना तिच्या कुटुंबियांना कळताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकून गेली. त्यानंतर त्यांनी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना सर्व प्रकार सांगितला आणि त्यानंतर सातही जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.
ADVERTISEMENT
