Gogamedi Murder: गोळ्या घालून केली चाळण, कोण होते सुखदेव सिंह गोगामेडी?

रोहित गोळे

• 02:22 PM • 05 Dec 2023

Sukhdev Singh Gogamedi Murder: सुखदेव सिंग गोगामेडी हे पद्मवती चित्रपटाला विरोध केल्याने प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यानंतर ते अनेकदा चर्चेत आलेले, पण आता त्यांची थेट घरात घुसून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

know who was sukhdev singh gogamedi who was murdered by bullets old connection with controversies rajasthan crime murder case

know who was sukhdev singh gogamedi who was murdered by bullets old connection with controversies rajasthan crime murder case

follow google news

Sukhdev Singh Gogamedi: जयपूर: जयपूरमध्ये आज दिवसाढवळ्या एकच खळबळ माजली. कारण काही हल्लेखोरांनी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी यांची त्यांच्याच घरात घुसून अत्यंत निर्घृणपणे हत्या केली.. गोगामेडी यांच्या हत्येनंतर राजपूत समाजात संतापाचे वातावरण आहे. या हत्येनंतर पोलीस सतर्क झाले आहेत. या खुनात सहभागी असलेले हल्लेखोर आता फरार झाले आहेत.

हे वाचलं का?

सुखदेव सिंग गोगामेडी हे नेहमीच वादात राहिले आहेत. ‘पद्मवती’ चित्रपटाला विरोध करून ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. गोगामेडी यांचा गुन्हेगारी घटनांमध्ये सहभाग असल्याने करणी सेनेने त्यांची हकालपट्टीही केली होती. यानंतर त्यांनी श्री राजपूत राष्ट्रीय करणी सेना स्थापन केलेली.

गोगामेडी यांचा वादांशी जुना संबंध

सध्या ज्या घरात त्यांची हत्या झाली होती ते घरही गोगामेडींनी बळजबरीने बळकावले होते. मिळालेल्या माहितीनुसार, गोगामेडी यांनी तीन लग्न केली होती. गोगामेडी यांचे त्यांच्या पत्नींशी वाद होते. त्यांच्या दोन्ही पत्नींनी सोशल मीडियावर येऊन त्यांच्याविरोधात गंभीर आरोपही केले होते.

हे ही वाचा>> Pune Crime : ‘तुला खल्लासच करतो’, ‘हा’ संशय अन् नवऱ्याचे पत्नीवर सपासप वार

राजकारणाशीही होता संबंध

याआधी गोगामेडी भद्रा विधानसभा मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मागील विधानसभा निवडणुकीत ते भाजपसोबत होते, तर यावेळी ते मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय धर्मेंद्र राठोड यांच्यासोबत होते. हनुमानगढ जिल्ह्यातील न्यायालयीन सुनावणीदरम्यान व्हिटनेस बॉक्समधून उडी मारून पळून गेल्याने ते प्रथमच प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यांना लोक ‘सुखिया’ नावाने हाक मारायचे. ‘आज तक’च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये त्यांना पद्मवती चित्रपट प्रदर्शित करण्याच्या बदल्यात पैसे मागताना पकडण्यात आले होते.

पोलीस आयुक्तांचे निवेदन

या हत्याकांडावर जयपूरचे पोलीस आयुक्त बिजू जॉर्ज जोसेफ यांनी सांगितले की, हल्लेखोरांची ओळख पटली आहे. एक हल्लेखोर, नवीन सिंग शेखावत, जो शाहपुरा, जयपूरचा रहिवासी होता. ज्याचे कपड्यांचे दुकान आहे. त्याचा क्रॉस फायरिंगमध्ये मृत्यू झाला आहे. उर्वरित दोन हल्लेखोरांनी बाइकवरून पळ काढला.

सुरुवातीला सुरक्षा रक्षकाशी बोलून हल्लेखोर आत गेले होते. गोगामेडी यांच्या सांगण्यावरूनच त्यांना सकाळी आत बोलावण्यात आले होते. हल्लेखोर गोगामेडी यांच्याशी बोलत होते, त्यानंतर काही वेळातच त्यांनी सुखदेव सिंग गोगामेडी यांच्यावर गोळीबार केला.

हे ही वाचा>> Gogamedi Murder: घरात घुसून 12 गोळ्या झाडल्या, निर्घृण हत्येचा हादरवून टाकणारा Video

गोगामेडी हत्या प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेत. यामध्ये हल्लखोर आरामात बसून सुखदेव सिंग गोगामेडी यांच्याशी बोलत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यानंतर त्यांनी अचानक गोळीबार केला. सुखदेव सिंह गोगामेडी यांची जयपूरमधील श्याम नगर जनपथ येथील घरी हत्या करण्यात आली. सध्या या हत्याकांडाची जबाबदारी राजस्थानच्या रोहित गोदारा टोळीने घेतली आहे.

तीन हल्लेखोर स्कूटरवरून आले, अन्…

एकूण तीन हल्लेखोर स्कूटरवर बसून तेथे आले होते, अशी माहिती मिळाली आहे. गोगामेडी यांना भेटायचे आहे, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर तो खोलीत गेला आणि तेथे बसून सुमारे 10 मिनिटे बोलला. यानंतर हा गोळीबार झाला. गोळ्या झाडल्यानंतर गोगामेडीच्या गार्डनेही गोळीबार केला. या क्रॉस फायरिंगमध्ये एका हल्लेखोराचाही मृत्यू झाला आहे. नवीन शेखावत असे त्यांचे नाव सांगण्यात आले आहे.

    follow whatsapp