Malshej ghat : रिक्षावर कोसळली दरड, माळशेज घाटात दोघांचा जागीच मृत्यू

Accident in Malshej Ghat : कल्याणवरून अहमदनगरला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळल्याने दोनजण जागीच ठार झाले आहेत.

Mumbai Tak

रोहिणी ठोंबरे

12 Jun 2024 (अपडेटेड: 14 Jun 2024, 08:24 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कल्याणवरून अहमदनगरला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात मोठी दुर्घटना घडली

point

टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या रिक्षावर दरड कोसळल्याने हा अपघात झाला.

point

मृतांमध्ये एका काका-पुतण्याचा समावेश आहे.

Landslide in Malshej Ghat : कल्याणवरून अहमदनगरला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात मोठी दुर्घटना घडली आहे. महामार्गावरून जात असताना रिक्षावर अचानक डोंगरकडा पडला, त्यामुळे या अपघातात दोनजण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये एका काका-पुतण्याचा समावेश आहे. 30 वर्षीय राहुल भालेराव आणि 7 वर्षीय स्वयंम भालेराव अशी मृत्यू झालेल्या काका-पुतण्याची नावं आहेत. तर, तीनजण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (landslide on a rickshaw in Malshej Ghat kalyan nagar national highway two died on the spot)

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड येथे राहणारे भालेकर कुटुंबीय रिक्षाने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामधील चंदनापुरी येथे मूळ गावी जात होते. कल्याणकडून नगरकडे जात असताना मुरबाड सोडल्यानंतर टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या रिक्षावर दरड कोसळल्याने हा अपघात झाला. यावेळी रिक्षातील तिघांना तातडीने आपले स्वत:चे प्राण वाचवले. पण, दुर्दैवाने या अपघातात काका-पुतण्याचा जागीच मृत्यू झाला. 

हेही वाचा : Baramati : सुनेत्रा पवार खासदार होणार? राष्ट्रवादीत घडामोडींना वेग

घटनेची माहिती मिळताच टोकावडे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. रिक्षातील तीन जणांचा जीव थोडक्यात वाचला असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. कल्याणवरुन अहमदनगरच्या दिशेने जाण्यासाठी माळशेज घाटातून जाणारा हा एकमेव मार्ग आहे.

हेही वाचा : विधानसभेत महायुती, MVA 'एवढ्या' जागा जिंकतील? पाहा यादी!

दरवर्षी, पावसाळ्यात कल्याण -नगर मार्गावर दरड कोसळते. मात्र, यंदा पहिल्या पावसातच दरड कोसळून दोघांना प्राण गमवावे लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यामध्ये या घटातून प्रवाशांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो.

    follow whatsapp