Baramati : सुनेत्रा पवार खासदार होणार? राष्ट्रवादीत घडामोडींना वेग
Sunetra Pawar Rajya Sabha elections : बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांना आता राज्यसभेतून खासदार करण्याची मागणी होत आहे. त्यांचे नाव आघाडीवर आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सुनेत्रा पवार होऊ शकतात राज्यसभा खासदार
बारामती लोकसभा मतदारसंघातून झाला होता पराभव
सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचा केला होता पराभव
Sunetra Pawar Latest News : बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांचे नाव राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. लोकसभेला पराभूत झाल्यानंतर सुनेत्रा पवारांना संसदेत पाठवण्याच्या दृष्टीने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील रिक्त जागेसाठी निवडणूक लागणार आहे. यात सुनेत्रा पवारांना पाठवण्याची मागणी पक्षातून झाली आहे. (Sunetra Pawar is the frontrunner as NCP nominee for Rajya sabha election 2024)
ADVERTISEMENT
अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांचा तब्बल 1 लाख 53 हजार इतक्या मताधिक्याने पराभव केला.
अजित पवारांसाठी धक्का
बारामती लोकसभा मतदारसंघाचा निकाल अजित पवारांसाठी धक्का असल्याचे राजकीय विश्लेषक म्हणत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार अध्यक्ष आहेत. अशात त्यांच्याच पत्नीचा बारामतीत लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्याने त्यांच्या नेतृत्वाबद्दलच्या चर्चांनाही तोंड फुटले आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा >> विधानसभा निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी 'एवढ्या' जागा जिंकतील? यादीच पाहा!
सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी
उदयनराजे भोसले लोकसभेवर निवडून गेल्यामुळे एक जागा रिक्त झाली आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिली जाणार आहे. या जागेवरून राज्यसभेत जाण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते महत्त्वाचे इच्छुक आहेत.
हेही वाचा >> NDA च्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचं नुकसान, नेमकं कसं?
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी केली आहे. तसेच राष्ट्रवादीतील काही नेत्यांचा तसा सूर आहे. सुनेत्रा पवार यांचे नाव आघाडीवरून असून, या जागेवरून राज्यसभेत जाण्यासाठी छगन भुजबळ, बाबा सिद्दीकी हेही इच्छुक असल्याचे समजते.
ADVERTISEMENT
पार्थ पवारांनी घेतली होती तटकरे-पटेलांची भेट
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली होती. त्यांच्यात काय चर्चा झाली, याबद्दल काही कळू शकले नसले, तरी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचे प्रयत्न होत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे लोकसभेला पराभूत झालेल्या सुनेत्रा पवारांचे खासदारकीचे स्वप्न पूर्ण होणार का, हे बघावं लागेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT