लातूर हादरलं! 9 वर्षाच्या चिमुकलीवर 50 वर्षीय वासनांध पुरुषाने खोलीत नेतं केलं लैंगिक शोषण, नंतर गुप्तांग दुखू लागल्यानं...

Latur crime : लातूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आलेला आहे. एक लहान मुलगी मेडिकल स्टोअरमध्ये औषध आणण्यासाठी गेली असता, त्या मुलीवर मेडिकल स्टोअरच्या कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला आहे, या घटनेनं लातूर शहर हादरून गेलं आहे.

Latur crime

Latur crime

मुंबई तक

05 Nov 2025 (अपडेटेड: 05 Nov 2025, 01:31 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मेडिकल स्टोअरमध्ये गोळी आणण्यासाठी गेलेल्या नराधमाने मुलीचं केलं लैंगिक शोषण

point

एवढा वेळ कुठे होती? आईचा मुलीला प्रश्न

point

घटनेनं लातूर हादरलं!

Latur Crime : लातूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आलेला आहे. एक लहान मुलगी मेडिकल स्टोअरमध्ये औषध आणण्यासाठी गेली असता, त्या मुलीवर मेडिकल स्टोअरच्या कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला आहे. पीडित मुलगी ही 9 वर्षांची असून नराधम मेडिकल स्टोअर कर्मचाऱ्याचे वय 50 आहे. ही घटना 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:30 वाजता लातूरमध्ये घडली. या घटनेनं लातूर हादरून गेलं. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बार्शी हादरली, स्टोलने गळा आवळला, शरीरावर 17 वार केले; अनैतिक संबंधातून विवाहितेला क्रूरपणे संपवलं

मेडिकल स्टोअरमध्ये गोळी आणण्यासाठी गेलेल्या नराधमाने मुलीचं केलं लैंगिक शोषण

मुलीच्या आईची मान दुखत असल्याच्या कारणाने तिने आपल्या मुलीला मेडिकल स्टोअरमधून गोळी आणण्यास सांगितली होती. संबंधित नराधम कर्मचाऱ्याचे नाव चिमनशेट्टे असे आहे. त्याने पीडितेला फसवून मेडिकलच्याच वरील एका खोलीत नेलं आणि तिच्यावर लैंगिक शोषण केलं. त्यानंतर तिच्या हातात पंधरा रुपये देऊन तिला घरी पाठवलं. 

एवढा वेळ कुठे होती? आईचा मुलीला प्रश्न

घरी गेल्यानंतर तिच्या आईने एवढा वेळ कुठे होती? असा प्रश्न केला. त्यावर पीडितेनं सांगितलं की, माझ्या गुप्तांगाला वेदना होत आहेत. एका खोलीत नेत, झालेल्या सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. तेव्हा तिच्या आईने आपल्या मुलीचं कपडे पाहिले आणि शरीराची तपासणी केल्यानंतर आपल्या मुलीवर लैंगिक शोषण झाल्याचे आईला संशय बळावला. 

हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगरमध्ये भर चौकात एकट्या मुलीला पाहून तरुणाचे अश्लील चाळे, तरुणीने भर रस्त्यात चोप देताच पाया पडला

या प्रकरणात आईने पोलीस ठाणे गाठून मेडिकल कर्मचारी दत्ता चिमनशेट्टेविरोधात तक्रार दाखल केली. आरोपीविरोधात भारतीय संहितेच्या कलम 64(1), 64(2)(i), 4, 6 अंतर्गत गुन्हा पोलीस ठाण्यात एफआरआय दाखल केली. त्यानंतर आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, पीडितेला लातूर शहरातील एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

    follow whatsapp