छत्रपती संभाजीनगरमध्ये भर चौकात एकट्या मुलीला पाहून तरुणाचे अश्लील चाळे, तरुणीने भर रस्त्यात चोप देताच पाया पडला

मुंबई तक

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये एकट्या मुलीला पाहून तरुणाचे अश्लील चाळे, तरुणीने भर रस्त्यात चोप देताच पाया पडला

ADVERTISEMENT

Chhatrapati Sambhajinagar Crime
Chhatrapati Sambhajinagar Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

छत्रपती संभाजीनगरमध्ये एकट्या मुलीला पाहून तरुणाचे अश्लील चाळे

point

तरुणीने भर रस्त्यात चोप देताच पाया पडला

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या मध्यवर्ती क्रांती चौकात सोमवारी दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला. मैत्रिणीची वाट पाहत उभ्या असलेल्या 17 वर्षीय तरुणीकडे एका विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीने अश्लील इशारे करत त्रास दिला. मात्र, ही तरुणी न घाबरता थेट पोलिसांकडे गेली आणि शेवटी त्या विकृताचा माज उतरवला. तरुणीने पोलिसांसमक्ष संबंधित तरुणाला चांगलाच चोप दिला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही घटना सोमवारी (दि.3) दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.

तरुणीकडून विकृत व्यक्तीला पोलिसांसमोर चोप 

अधिकची माहिती अशी की, जालना जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील ही तरुणी शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरात राहत आहे. ती क्रांती चौक परिसरात आपल्या मैत्रिणीची वाट पाहत असताना, तेथे उपस्थित असलेला खिवाराम कानाराम देवासी (वय ४८, रा. हुबळी, कर्नाटक) या व्यक्तीने तिच्याकडे पाहून अश्लील चाळे सुरू केले. सुरुवातीला मुलीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले, परंतु तो थांबला नाही. उलट, नोटा दाखवत आणखी अश्लील इशारे करायला लागला. या वर्तनामुळे घाबरलेली पण धाडसाने वागणारी तरुणी ताबडतोब जवळच उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांकडे गेली आणि सर्व घडलेली घटना सांगितली.

हेही वाचा : स्थानिक निवडणुका जाहीर होताच शरद पवारांचा मोठा डाव, बीडमधील नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

पोलिसांनी लगेच दामिनी पथकाला माहिती दिली. काही क्षणांतच दामिनी पथकातील अधिकारी निर्मला निंभोरे आणि पोलिस निरीक्षक सुनील माने घटनास्थळी दाखल झाले. या वेळी, आरोपीने पोलिस आणि पथकाच्या उपस्थितीतही अश्लील हालचाली सुरू ठेवल्या. त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणीने स्वतःच पुढे येत त्या विकृत चालकाला चांगलाच धडा शिकवला. सर्वांसमोर तिने त्या विकृताला चोप दिलाय. उपस्थित नागरिकांनीही तिचे धैर्य कौतुकास्पद असल्याचे म्हटले. घटनेच्या वेळी क्रांती चौक परिसरात मोठी गर्दी जमली होती. उपस्थितांनी या प्रसंगाचा व्हिडिओ चित्रीत करून सोशल मीडियावर शेअर केला, जो काही तासांतच व्हायरल झाला. नागरिकांनी पोलिस प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp