कल्याण : कामावरुन काढण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल, केडीएमसीतील लिपिकाकडून कर्मचारी महिलेकडे शरीरसुखाची मागणी

केडीएमसीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका वरिष्ठ लिपिकाने महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी केली. याविषयी पीडितेने महापालिकेतील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने पीडितेने पोलिसांकडे धाव घेतली आहे.

Kalyan Crime

Kalyan Crime

मिथिलेश गुप्ता

• 01:44 PM • 01 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

कामावरुन काढण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल

point

केडीएमसीतील लिपिकाकडून कर्मचारी महिलेकडे शरीरसुखाची मागणी

point

केडीएमसीकडून अद्याप कोणतीही कारवाई नाही

Kalyan Crime : केडीएमसी अधिकाऱ्याने ब्लॅकमेल करत एका महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भूषण पाटील असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव असून तो वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहे.  केडीएमसी अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी करुन देखील या वरिष्ठ लिपीकाच्या विरोधात कोणतीही कारवाई झाली नव्हती. अखेर पीडित महिला कर्मचाऱ्याने मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे भूषण पाटील याच्या विरोधात आणखी काही महिलांनी अशा प्रकारचा आरोप केल्याची माहिती समोर आली आहे. 

हे वाचलं का?

'तुला काम येत नाही'

काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलात कार्यरत असलेल्या महापालिकेच्या कर्मचारी महिलेसोबत एका कामावरुन भूषण पाटील याचा वाद झाला. अन्य कर्मचार्‍यांसोबत भूषण पाटील याने त्या कर्मचारी महिलेस 'तुला काम येत नाही' असे म्हणत तिला शि्व्या देण्यास सुरुवात केली. यावेळी अन्य कर्मचार्‍यांनी त्याला थांबविले.

हे ही वाचा : अकोला : 'तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव..' महिला आरोपीकडे पोलिसाची आक्षेपार्ह मागणी; व्हिडिओ व्हायरल

फोनवरुन शरीरसुखाची मागणी 

हे प्रकरण ताजे असताना भूषण पाटील याने एके दिवशी पीडित कर्मचारी महिलेस फोन केला. त्याने व्हॉटसअप कॉल होता. 'तुझ्यासह एकाला कामावरुन काढण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहे. त्याने माझ्याशी सेटलमेंट केली आहे. त्याच्या विरोधातील कारवाई मी थांबविली आहे. मात्र तू मला काय देशील? तुझ्याकडून मला शरीरसुख हवे आहे.' अशी मागणी कॉलवर बोलताना त्याने केली. या संदर्भात पीडित कर्मचारी महिलेने तिच्या वरिष्ठांना ही माहिती दिली. मात्र कारवाई झाली नाही.

हे ही वाचा : चिमुरड्याला चार तास कोंडलं डीप फ्रीजरमध्ये, चोरीच्या संशयातून दुकानदाराचे कृत्य; यातनेने विव्हळणाऱ्या चिमुरड्याचं काय झालं?

मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा 

यानंतर कर्मचारी महिलेने मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. मानपाडा पोलिसांनी भूषण पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक संदीपान शिंदे यांनी सांगितले की, 'भूषण पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. त्याला नोटिस दिली आहे. पूढील तपास सुरु आहे.' या प्रकरणी ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांनी सांगितले की, संबंधित प्रकरणाची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुरु आहे. त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.