Maharashtra IMD Rain Alert : आज (29 ऑक्टोबर 2024) धनत्रयोदशीचा दिवस... देशभरात आजपासून दिवाळीच्या उत्सवाला सुरूवात झाली आहे. पण यासर्वात राज्याच्या अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ओडिशातील दाना चक्रीवादळामुळे राज्यात काही भागात पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (maharashtra weather forecast update Today 29 october rain alert in diwali to these districts IMD report mumbai pune)
ADVERTISEMENT
‘दाना’ चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्याला धडकल्यानंतर हवेतील बाष्प पश्चिमेकडे येत आहे. त्यामुळे दिवाळीत महाराष्ट्राच्या अनेक भागांत विजांचे फटाके आणि पावसाची आतषबाजी होण्याचा अंदाज आहे. कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे जाणून घेऊया.
हेही वाचा : White House Diwali : व्हाईट हाऊसमध्ये पेटला दिवाळीचा दिवा, जो बायडेन उपस्थित, तेव्हा सुनीता विल्यम्स अंतराळातून म्हणाल्या...
'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट!
IMD Rain Alert on Maharashtra:भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार (IMD), आज राज्यातील जवळपास 12 जिल्ह्यांवर पावसाचे सावट आहे. एकीकडे मुंबई सारख्या भागात उकाडा जाणवत असताना या जिल्ह्यांवर पावसाचे सावट निर्माण झाले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 29 ते 31 ऑक्टोबरदरम्यान राज्यात पावसाची शक्यता आहे. त्यात आज 29 रोजी छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, गडचिरोली, गोंदिया, अहिल्यानगर, पुणे, रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, जालना, भंडारा या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची एन्ट्री होऊ शकते.
Rainfall in these Districts:त्याचवेळी, 30-31 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा :Ratan Tata Property| Dhanteras Gold Silver Price|
ADVERTISEMENT
