White House Diwali : व्हाईट हाऊसमध्ये पेटला दिवाळीचा दिवा, जो बायडेन उपस्थित, तेव्हा सुनीता विल्यम्स अंतराळातून म्हणाल्या...

मुंबई तक

Diwali Celebration in White House: अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये दरवर्षी दिवाळी सण साजरा केला जातो. यंदाही जो बायडेन यांनी ही परंपरा सुरू ठेवत या सोहळ्याचं आयोजन केलं होतं. आपल्याला हा सोहळा आयोजित करण्याचं भाग्य मिळालं असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी
व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी
social share
google news

बातम्या हायलाइट

point

व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी

point

जो बायडेन यांच्याकडून शुभेच्छा!

point

सुनीता विल्यम्स यांच्या अंतराळातून शुभेच्छा

Diwali Celebration: अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्येही दिवाळीचा दिवा पेटला. भारतात सध्या दिवाळीची तयारी सुरू आहे. त्यासाठी बाजारपेठा सजल्या, घरी, अस्थापनांमध्ये परिसरात स्वच्छता करुन प्रकाशमय करण्यासाठी तयारी केली जातेय. तर तिकडे सातासमुद्रापार व्हाईट हाऊसमध्येही दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीचा उत्सव साजरा केला जातोय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. विशेष म्हणजे यावेळी अंतराळातून सुनिता विल्यम्स यांनीही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात शेकडो भारतीय वंशाचे कर्मचारी उपस्थित होते. (Diwali celebration in White house in presence of president joe biden )

 

हे ही वाचा >>Constituency Wise Shiv Sena (Shinde) Candidates List: शिवसेनेची तिसरी यादी जाहीर... शिंदेंमुळे भाजपच्या 'या' नेत्याचं स्वप्न भंगलं?

 

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये दरवर्षी दिवाळी सण साजरा केला जातो. यंदाही जो बायडेन यांनी ही परंपरा सुरू ठेवत या सोहळ्याचं आयोजन केलं होतं. आपल्याला हा सोहळा आयोजित करण्याचं भाग्य मिळालं असंही ते यावेळी म्हणाले आहेत. मात्र, भारतीय वंशाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन  या उपस्थित नव्हत्या.  हॅरिस प्रचारात असल्याने इथे येऊ शकल्या नाहीत असं सांगताना जो बायडेन यांनी कमला हॅरिस यांचं कौतुकंही केलंय. 

 

हे वाचलं का?

    follow whatsapp