राज्याला पावसानं झोडपलं, कोकणासह मराठवाड्यात शेतकऱ्यांची उडाली दाणादाण, आजची हवामान परिस्थिती वाचा

Maharashtra Weather : राज्यातील हवामानाचा अंदाजाची माहिती भारतीय हवामान विभाग (IMD) अधिकृत स्रोतांच्या आधारित आहे. यामध्ये जिल्हानिहाय पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Maharashtra Weather Forecast

Maharashtra Weather Forecast

मुंबई तक

• 06:00 AM • 24 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज

point

24 सप्टेंबर रोजी एकूण हवामानाचा अंदाज कसा असेल?

Maharashtra Weather : राज्यातील हवामानाचा अंदाजाची माहिती भारतीय हवामान विभाग (IMD) अधिकृत स्रोतांच्या आधारित आहे. यामध्ये जिल्हानिहाय पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील पावसाची एकूणच परिस्थिती पाहता, हलका ते मध्यम विजांच्या कडकडाटासह हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात 24 सप्टेंबर रोजी एकूण हवामानाचा अंदाज कसा असेल याबाबत थोडक्यात माहिती जाणून घ्या.

हे वाचलं का?

हे ही वाचा : मराठवाड्याला पावसानं झोडपलं, बीडमध्ये शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली, विद्यार्थ्यांची वह्या पुस्तकं गेली वाहून

कोकण विभाग :

कोकण विभागातील रायगड, पालघर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हवामान विभागाने पावसाची शक्यतेचा अंदाज वर्तवला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर रायगड, पालघर, ठाणे जिल्ह्यात 30-40 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र विभाग :

मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, अहिल्यानगर, जळगाव या जिल्ह्यांचा समावेश होतो. यापैकी पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच यापैकी नाशिक, नाशिक घाटमाथा , पुणे, नाशिक घाट परिसरात विजांच्या कडकडाटासह, हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावासाचा अंदाज आहे. याच ठिकाणी 30-40 किमी प्रतितास वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

मराठवाडा विभाग : 

मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश होतो. यापैकी परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची हवामान विभागाने शक्यता जारी केली आहे. तसेच लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडक़ाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे.

हे ही वाचा : मामावर जडला भाच्याच्या पत्नीचा जीव, जवळीकता वाढताच दोघांनी रचला खतरनाक कट, भाच्याला दारू पाजून...

विदर्भ विभाग :

विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. यातील अकोला,अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यात हवामान विभागाने कसलीही शक्यता वर्तवली नाही.

    follow whatsapp