Maharashtra Weather : राज्यात वातावरणात सातत्याने काही प्रमाणात बदल होताना दिसत आहे. काही ठिकाणी ऊन तर कुठे अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कोकणातील पालघर, ठाणे आणि मुंबईसारख्या शहरात हवामान कोरडं राहील अशी शक्यता वर्तवली आहे, अशातच जाणून घेऊयात राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुणे : नवऱ्याने बायकोच्या गुप्तांगावर ओतलं अॅसिड, 15 दिवस असह्य..
कोकण
कोकण विभागात पालघर, ठाणे आणि मुंबईमध्ये कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच रायगडमध्ये मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
मध्य महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर आणि सोलापूर या जिल्ह्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली. पुणे आणि सांगली जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सातारा, कोल्हापूर या दोन जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाडा
मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना या दोन जिल्ह्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. परभणी या जिल्ह्यांत उष्णतेची लाट उसळण्याची शक्यता आहे. बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.
हे ही वाचा : मुलीला विहिरीत फेकलं, दगडानं ठेचून मातीत पुरलं.. बापाचं हैवानी कृत्य
विदर्भ
विदर्भातील अकोला, अमरावती आणि नागपूर या तीन जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच वर्धा आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला.
ADVERTISEMENT











