Maharashtrea Weather : हिवाळा ऋतू सुरु झाला असला तरी राज्यात नोव्हेंबर महिन्यात किमान सरासरीच्या तुलनेत अधिक तापमान राहिल असा हवामान विभागाने इशारा दिला आहे. तसेच काही ठिकाणी पावसाचीही परिस्थिती असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, राज्यातील एकूण हवामानाचा पुढील अंदाज जारी करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : कल्याण स्थानकावर आईच्या कुशीतून 8 महिन्याच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांना आली जाग अन्... घटना CCTV मध्ये कैद
कोकण विभाग :
कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यात हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज जारी केला आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवला असून येलो अलर्ट जारी केला आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्गात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रत धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे या जिल्ह्यात हवामान विभागाने हलक्या स्वरुपाचा पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवला. तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी केला आहे.
मराठवाडा विभाग :
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत हलक्या पावसासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : मुंबईत टॅक्सी ड्रायव्हरची बांबूने हल्ला करत निर्घृण हत्या, मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात, हल्लेखोर एकाच कुटुंबातील...
विदर्भ विभाग :
राज्यातील विदर्भ विभागात हवामान विभागाने बुलढाणा, अकोला, वर्धा, वाशिम, यवतमाळ,अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांत हवामानाचा कसलाही अंदाज जारी केलेला नाही.
ADVERTISEMENT











