मुंबईत टॅक्सी ड्रायव्हरची बांबूने हल्ला करत निर्घृण हत्या, मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात, हल्लेखोर एकाच कुटुंबातील...
Mumbai crime : मुंबईतील साकीनाका परिसरातील पोलीस ठाणे क्षेत्रात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका टॅक्सी ड्रायव्हरची जेवण न आणल्याच्या कारणावरून हत्या करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नेमकं काय घडलं?
जावेदला बांबूने मारहाण आणि मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात
Mumbai Crime : मुंबईतील साकीनाका परिसरातील पोलीस ठाणे क्षेत्रात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका टॅक्सी ड्रायव्हरची जेवण न आणल्याच्या कारणावरून हत्या करण्यात आली आहे. संबंधित टॅक्सी ड्रायव्हर हा जेवण आणायचा. पण, त्याने एक दिवस जेवण न आणल्याच्या रागातून संबंधितांनी टॅक्सी ड्रायव्हरची हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
हे ही वाचा : पुण्याची गोष्ट : पुणेकरांना हक्काचं घर विकत घेणं होणार सोपं, 90 लाखांचं घर मिळणार 28 लाखात, असा करा अर्ज
नेमकं काय घडलं?
या प्रकरणातील पाचही आरोपी टॅक्सी ड्रायव्हर हे उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील रहिवासी आहेत. मुंबईतील एका खोलीत ते भाडेतत्वावर राहतात. जावेद खान (वय 42) नावाचा एक व्यक्ती त्यांना दररोज जेवण आणायचा. पण त्याने एकेदिवशी रात्री जेवणच न आणलं न आणल्याच्या रागातून जावेद खानशी वाद घातला. त्यानंतर वादाचे रुपांतर हे मारहाणीत झालं.
जावेदला बांबूने मारहाण, मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात
दरम्यान, जावेदसोबत राहणाऱ्या शबाज खान, त्याचे वडील आणि इतर दोन्ही काकांनी या शुल्लक करणावरून जावेद खानला बांबूने बेदम मारहाण केली. या मारहाणीत जावेद रक्तबंबाळ झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर ते टॅक्सी घेऊनच तिथून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा : 'राज ठाकरेंच्या छातीवर बसेन', परप्रांतीय सेक्युरीटी गार्डची मुजोरी, मनसैनिकांनी चोप देताच नरमला, व्हिडिओ व्हायरल
पोलिसांनी एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच इतर तीन आरोपींचा तपास सुरु आहे. आरोपी आणि मृत्यू झालेला व्यक्ती हे सारेचजण उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.










