स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असतानाच मंत्रिमंडळ बैठकीत 21 धडाकेबाज निर्णय!
Maharashtra Cabinet Decision : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर होण्याची शक्यता असतानाच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 21 धडाकेबाज निर्णय!
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत 21 धडाकेबाज निर्णय!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर होण्याची शक्यता असतानाच राज्य सरकारचे मोठे निर्णय
Maharashtra Cabinet Decision : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मा. राज्य निवडणूक आयुक्तांनी आज (दि.4) दुपारी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. मा. राज्य निवडणूक आयुक्त श्री. दिनेश वाघमारे हे आज मंगळवार, दि. 04 नोव्हेंबर 2025 रोजी दु. 4.00 वाजता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सचिवालय जिमखाना येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. या पत्रकार परिषेदत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होणार असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत 21 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य सरकारने घेतलेले निर्णय सविस्तर जाणून घेऊयात...
मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)
(सार्वजनिक बांधकाम विभाग)
विरार ते अलिबाग बहुउद्देशिय वाहतूक मार्गिका (VAMMC) प्रकल्पाच्या कर्जास शासन हमी देण्यास मान्यता. हुडको कडून घेण्यात येणारे हे कर्ज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ भूसंपादनासाठी येणाऱ्या खर्चासाठी वापरणार आहे.
(उच्च व तंत्रशिक्षण विभाग)










