पाकिस्तानतील सुप्रीम कोर्टाच्या इमारतीत मोठा स्फोट, 12 जण गंभीर जखमी; नेमकं काय घडलं?
Pakistan supreme court gas cylinder explosion : पाकिस्तानतील सुप्रीम कोर्टाच्या इमारतीत मोठा स्फोट, 12 जण गंभीर जखमी; नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पाकिस्तानतील सुप्रीम कोर्टाच्या इमारतीत मोठा स्फोट
12 जण गंभीर जखमी; नेमकं काय घडलं?
Pakistan supreme court gas cylinder explosion : पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत स्फोट झाला असून, या घटनेत 12 जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाच्या तळमजल्यातील कँटीनमध्ये गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाल्याची चर्चा सुरु होती. मात्र, नंतर स्थानिक माध्यमांनी याबाबत दिलेल्या सविस्तर वृत्त दिले असून हा स्फोट एअर कंडिशनिंग सिस्टमची दुरुस्ती सुरू असताना झालाय.
सर्वोच्च न्यायालयाच्या किचनमध्ये एसींच्या दुरुस्तीदरम्यान स्फोट
पाकिस्तानच्या Samaa TV चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार, सूत्रांनी पुष्टी केली आहे की, स्फोट इमारतीच्या सेंट्रल एअर कंडिशनिंग सिस्टमच्या दुरुस्ती दरम्यान झाला. अचानक झालेल्या या स्फोटामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. स्फोटाचे कंपन इतके तीव्र होते की संपूर्ण इमारत हादरली. त्यामुळे वकील, न्यायाधीशांचे कर्मचारी आणि इतर अधिकारी घाबरून बाहेर धावले.
हेही वाचा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असतानाच मंत्रिमंडळ बैठकीत 21 धडाकेबाज निर्णय!
स्थानिक वृत्तांनुसार, या स्फोटात कोर्ट क्रमांक 6 चे मोठे नुकसान झाले आहे. स्फोट होण्यापूर्वी न्यायमूर्ती अली बाकर नजफी आणि न्यायमूर्ती शाहजाद मलिक या कोर्टात सुनावणी घेत होते. जखमी झालेले बहुतांश कर्मचारी हे एसी दुरुस्तीच्या कामात गुंतलेले होते. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे. माहितीनुसार, तळमजल्यातील कँटीन केवळ सर्वोच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांसाठी राखीव आहे.










