कल्याण: आईच्या कुशीतून 8 महिन्याच्या बाळ चोरलं तरी कसं? CCTV पाहून सगळे झाले हैराण!

मुंबई तक

Kalyan Crime : कल्याण रेल्वे स्थानकावर एक मन धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आईच्या कुशीत झोपलेल्या आठ महिन्याच्या बाळाला मध्यरात्री पळवून नेलं.

ADVERTISEMENT

kalyan crime
kalyan crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आरोपीने आईच्या कुशीत झोपलेल्या बाळाला उचलले 

point

सीसीटीव्हीतून धक्कादायक प्रकार समोर 

point

कल्याण स्थानकावर मध्यरात्री काय घडलं?

Kalyan Crime : कल्याण रेल्वे स्थानकावर एक मन धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आईच्या कुशीत झोपलेल्या आठ महिन्याच्या बाळाला मध्यरात्री पळवून नेलं.  या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित प्रकरणातील आरोपीचे नाव अक्षय खरे असे असून पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे माहिती मिळवत आणि शोध घेत बेड्या ठोकल्या आहेत. 

हे ही वाचा : तरुणाने तिला गाडीवर बसण्यास जबरदस्ती केली, नंतर तिच्यावर लैंगिक शोषण केलं, ती रक्तबंबाळ अवस्थेत मध्यरात्री...

आरोपीने आईच्या कुशीत झोपलेल्या बाळाला उचलले 

मिळालेल्या माहितीनुसार, बाळाच्या आईचे नाव पूनम पोंगरे आणि वडिलांचे नाव निलेश पोंगरे असून ते दाम्पत्य पुणे येथील रहिवासी आहेत. पुण्याहून ते कुटुंबीय कल्याणला आले होते. तेव्हा ते आपल्या आठ महिन्याच्या बाळाला घेऊन झोपले होते. तेव्हाच आरोपी अक्षय खरेनं आईच्या कुशीत झोपलेल्या बाळाला उचलले. या प्रकरणाचा आई वडिलांना कसलाही पत्ता लागला नाही. 

सीसीटीव्हीतून धक्कादायक प्रकार समोर 

काही वेळानंतर महिलेला जाग आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. पूनम यांचा गोंधळ उडून झोपच उडाली. महिलेला तिच्या कुशीतील बाळ गायब झाल्याचं दिसलंय. त्यानंतर त्या दाम्पत्याने संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. महात्मा फुले पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सतीश सोनवणे यांनी सीसीटीव्ही पाहताच आरोपीला ओळखले. 

हे ही वाचा : मुंबईत टॅक्सी ड्रायव्हरची बांबूने हल्ला करत निर्घृण हत्या, मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात, हल्लेखोर एकाच कुटुंबातील...

संबंधित आरोपी अक्षयला मध्यरात्री फिरत असताना त्याला अनेकदा हटकण्याचा प्रयत्नही केला. तेव्हा अक्षयने आपल्या घरी आत्याशी वाद झाल्याने तक्रार करायला जात असल्याचे सांगितलं. तेव्हा सोनवणे यांनी अक्षयला त्याच्या घरी नेलं आणि समज दिली. बाळाचे अपहरण करणारा दुसरा तिसरा कोणीही नसून अक्षयच असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. स्थानकच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासातून आरोपीची ओळख पटवली. तेव्हा आरोपीच्या घरी बाळ आढळल्याचे दिसून आले. संबंधित प्रकरणात पोलिसांनी अक्षय खरे आणि त्याची आत्या सविता खरे या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp